Interesting Facts : भारतात (India) दारुचे (Liquor) अनेक शौकीन आहेत. भारतात सुमारे 16 कोटी लोक दारू पितात. भारतात दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भारतात प्रति व्यक्ती अल्कोहोलचं प्रमाण 5.61 लीटर आहे. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण खूप जास्त आहे. दारूच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विक्रीच्या माध्यमातून सरकारला चांगला पैसा मिळतो.
प्रत्येक राज्यात दारुची किंमत वेगळी
दारुची किंमत ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकसारखी नसते. प्रत्येक राज्यामध्य दारुची किंमत वेगळी असते. भारतात जीएसटी लागू आहे, पण दारूवर जीएसटीच्या बाहेर आहे. असं असलं तरी भरमसाठ कर भरल्यानंतर सामान्य माणसाच्या हाताच दारूची बाटली पोहोचते. दारूच्या एका बाटलीची मूळ किंमत किती आणि विविध कर लागू झाल्यानंतर दारूच्या बाटलीच्या किंमत किती वाढते, हे सविस्तर जाणून घ्या.
दारूच्या बाटलीची खरी किंमत किती?
नवीन वर्षाची चाहून लागली आहे. आता थर्टी फर्स्ट आणि न्यू एअर सेलिब्रेशनची चाहूल लागली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेशनसाठी दारूची विक्री वाढेल. नवीन वर्ष जल्लोषात साजरं करण्यासाठी लोक भरपूर दारू पितील. भारतात दारुचा खप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दारु पिताना लोक दारुच्या किमतीकडेही लक्ष देतात. पण, दारु कितीही महाग झाली, तरी लोक ती विकत घेतात. दारुच्या किमती किती वाढल्या तरी लोक मिळेल, त्या किमतीला दारु खरेदी करतात. पण, दारूच्या बाटलीची मूळ किंमत काय आहे आणि कर लावल्यानंतर त्याची किंमत किती वाढते. हे समीकरण जाणून घ्या.
वाइनच्या बाटलीची किंमत
दारू जीएसटीच्या बाहेर आहे, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारुची किंमत वेगवेगळी आहे. दरवर्षी दारू विक्रीतून सरकारची भरपूर कमाई होते. दारुमुळे सरकारच्या तिजोरीत भर पडते. एका दारूच्या बाटलीची किंमत हजार रुपये असेल तर त्यातील सरकार 30 ते 35 टक्के कर वसूल करते, असं सांगितलं जातं. म्हणजेच दुकानातून खरेदी होणाऱ्या 1000 रुपयांच्या बाटलीपैकी सुमारे 350 रुपये थेट सरकारच्या तिजोरीत जातात.
दारूवर एकच नाही तर अनेक कर
दारूच्या बाटलीवर जीएसटी नाहीतर, त्या व्यतिरिक्त अनेक कर आकारले जातात. यामध्ये विशेष आकाराचे वाहतूक शुल्क लेबल आणि नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. भारतात बनवलेल्या दारूवर कमी कर लागतो. पण, विदेशी बनावटीच्या दारूवरजास्त कर आकारला जातो. यामुळेच एका राज्यात 900 रुपयांची बाटली दुसऱ्या राज्यात 1400-1500 रुपयांना मिळते. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या करांमुळे दारुही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध आहे. दिल्लीत दारुची बाटली 100 रुपयांना मिळते, तर कर्नाटकात तीच बाटली 500 रुपयांना मिळते. महाराष्ट्रात जी दारू 800 रुपयांना मिळते, ती दारू गोव्यामध्ये 400 रुपयांना मिळते.