Lion Video Viral : शिकारीच्या बाबतीत जंगलाच्या राजाशी स्पर्धा करू शकतील, असे कमीच प्राणी असतील. सिंहाने (Lion Video Viral) एखादा प्राणी आपल्या जबड्यात पकडला की, त्याला फस्त केलंच म्हणून समजा. सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहिले असतील, जे वन्यजीव छायाचित्रकारांनी रेकॉर्ड केले आहेत. वन्यजीव छायाचित्रकार नेहमीच वनविश्वाची माहिती मानवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. ते एकतर स्वतः प्राण्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करतात किंवा ठिकठिकाणी कॅमेरे बसवतात, जेणेकरून प्राण्यांची माहिती मिळू शकेल.
सिंह कॅमेरा घेऊन जंगलात पळून गेला
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जंगलाचा राजा सिंह चक्क छायाचित्रकाराचा कॅमेरा चोरताना दिसत आहे. अशाप्रकारचे कृत्य सिंह हे क्वचितच करताना दिसले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वन्यजीव छायाचित्रकाराने जंगलात कॅमेरा बसवला होता, जेणेकरून प्राण्यांच्या हालचाली टिपता येतील. मात्र, सिंह छायाचित्रकाराचा कॅमेरा उचलून आपल्यासोबत घेऊन जाईल याची त्याला जराही कल्पना नव्हती.
जंगलात फिरत असताना त्याची नजर कॅमेऱ्यावर पडते तेव्हा....
सिंह जंगलात फिरत असताना त्याची नजर कॅमेऱ्यावर पडते. कॅमेरा पाहून सिंह त्या दिशेने येतो. कॅमेरा फिरताना पाहून सुरुवातीला सिंह घाबरतो. मात्र, नंतर तो कॅमेरा तोंडात दाबून तेथून पळून जातो. सिंह तोंडात कॅमेरा घेऊन खूप दूर जंगलात येतो. मात्र, एका ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा कॅमेरा सोबत घेऊन जातो. काही अंतर चालून गेल्यावर सिंह एका ठिकाणी कॅमेरा ठेवून तो निघून जातो. त्यानंतर काही छायाचित्रकार कारमध्ये येतात आणि कॅमेरा घेऊन निघून जातात.
नेटकऱ्यांकडून आश्चर्य
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @yourclipss नावाच्या युजरने शेअर केला आहे. सिंहाने कॅमेरा पळविल्यानंतर त्या कॅमेऱ्यात जे काही दृश्य कैद झाले, ते पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही जण म्हणतात, की याला पण Reel चे वेड लागले की काय? तर काही जण म्हणतात, हा तर कॅमेराचोर, अनेक जणांकडून या व्हिडीओवर प्रतिक्रिया येत आहेत. तसेच या व्हिडीओला हजारो लाईक्सही मिळत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Viral Video : ....आणि पठ्ठ्याने चक्क इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बांधला 'पेट्रोल पंप'! काय आहे व्हायरल व्हिडीओचे सत्य? जाणून घ्या