Viral Video : तुम्ही कधी 5व्या मजल्यावर बांधलेला पेट्रोल पंप (Petrol Pump) पाहिला आहे का? असा पेट्रोल पंप तुम्ही क्वचितच कुठे पाहिला असेल. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका इमारतीच्या 5व्या मजल्यावर पेट्रोल पंप बनवण्यात आला आहे. साधारणपणे पेट्रोल पंप जमिनीवर बांधले जातात. मात्र, इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने सर्वांनाच धक्का दिला आहे. बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावर कोणी पेट्रोलपंप कसा बांधू शकतो? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.



विचित्र पराक्रम


आपला शेजारी देश चीनने हा विचित्र पराक्रम केला आहे, असे तुम्हाला सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? कदाचित हे तुम्हाला पचनी पडणार नाही, पण चीनने खरोखरच हे केले आहे. चीन नेहमीच वेगवेगळ्या आणि विचित्र नवनवीन शोधांसाठी ओळखला जातो. मात्र त्यांच्या या नवकल्पना कायम राहण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे भारतीय लोक चिनी वस्तूंवर पटकन विश्वास ठेवत नाही. कारण हे फार काळ टिकणारे आणि टिकाऊ नसतात.


 






 


 



इमारतीच्या गच्चीवर पेट्रोल पंप बांधला
हा व्हायरल व्हिडीओ पहा, जो चीनच्या चोंगकिंग येथील असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल की, इमारतीचा पुढचा भाग अगदी खालपासून सुरू होत आहे. पुढच्या भागात एक रस्ता जात आहे, तर इमारतीच्या मागील बाजूने जाणारा दुसरा रस्ता इमारतीच्या 5 व्या मजल्याच्या पृष्ठभागाएवढा आहे. म्हणजे जो कोणी पेट्रोल भरायला येईल तो बिल्डिंगच्या मागच्या बाजूने येईल, कारण त्या भागात मुख्य रस्ता आहे. ही इमारत पाहता केवळ वाहने पार्किंग करण्याच्या उद्देशाने ही इमारत बांधण्यात आल्याचे दिसते. तर त्याचे छत पेट्रोल पंपात रूपांतरित केले आहे, जेणेकरून जागेचा योग्य वापर करता येईल.


 


नेटकऱ्यांना धक्का
चीनमधील हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील यूजर्सही हैराण झाले आहेत. एका यूजरने सांगितले की, 'हा खूप चांगला इनोव्हेशन आहे.' तर दुसरा यूजर म्हणाला, 'चीनची अभियांत्रिकी प्रतिभा अप्रतिम आहे.'


 


 


संबंधित बातम्या


Video Viral : 1 मिनिटात चक्क 500 ग्रॅम मोझरेला चीज खात केला 'वर्ल्ड रेकॉर्ड'! नेटकरी हैराण, व्हिडीओ व्हायरल