Trending Tortoise 100th Birthday : आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस साजरे करणे ही फिलिंगच फार आनंद देणारी असते. हा वाढदिवस अधिक चांगल्या पद्धतीने कसा साजरा करता येईल हा प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न असतो. असंच काहीसं कॅनडात पाहायला मिळालं आहे. या ठिकाणी कासवाने (Tortoise) तब्बल 100 वर्ष पूर्ण केली आहे. आणि या निमित्ताने हॅलिफॅक्सच्या संग्रहालयात (Museum) वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर हे कासव 1940 पासून कॅनडातील हॅलिफॅक्स येथील एका संग्रहालयात वास्तव्य करत आहे. या महिन्यात कासवाने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. या आनंदात संग्रहालयाने हा सोहळा साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, शुक्रवार 12 ऑगस्टपासून सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या निमित्ताने फुटबॉल क्लबने ट्विटरवर 100 वर्ष जुन्या कासवाचे फोटो शेअर केले आहेत.
पोस्ट शेअर करताना, फुटबॉल क्लबच्या हँडलने लिहिले आहे की, "आम्हाला माहीत असलेले सर्वात जुने वांडरर्स चाहते! @NS_MNH गस द गोफर टर्टलचा 100 वा वाढदिवस."
त्यानंतर संग्रहालयाने शुक्रवारी, 12 ऑगस्ट रोजी फेसबुकवर गसच्या फोटोंसह एक स्वतंत्र पोस्ट शेअर केली आणि लिहिले आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार!
सर्वात जुने गोफर कासव
म्युझियम मॅनेजर जेफ ग्रे यांच्या मते, "कासवाची 100 वर्ष मानवाच्या 100 वर्षांच्या बरोबरीची आहेत. 100 वर्षांचा पल्ला एका कासवाने गाठणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आम्ही ठरवले आहे." या कासवाला "द लेट्युस किंग" म्हणूनही ओळखले जाते. हे सर्वात जुने जिवंत गोफर कासव असल्याचे मानले जाते.
महत्वाच्या बातम्या :
- PM Modi : वयाच्या शंभरीतही PM मोदींच्या मातोश्रींची देशभक्ती पाहून सारेच आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
- Police For Rent : पोलिसांसोबत संपूर्ण पोलीस स्टेशन देखील भाड्याने मिळेल, जाणून घ्या भारताच्या 'या' राज्यातील अनोखा कायदा
- 75th independence day : रस्त्यावरुन जात होती तिरंगा यात्रा, वृद्ध व्यक्तीने पाहताच केला सलाम, व्हिडीओ व्हायरल