Video Viral : भारत देशातील नयनरम्य ठिकाणांबद्दल (Travel Places) बोलायचं झालं, तर त्या यादीत पहिला क्रमांक हिमाचल प्रदेशचा  (Himachal Pradesh) येतो. हिमाचल प्रदेशाला स्वर्ग म्हटले जाते, जे प्रत्येकाच्या हृदयात वसलेले आहे. या भागात फिरताना काहीवेळा तुम्हाला जंगल आणि खोऱ्यांमध्ये (Wild Animals In Himachal) वन्य प्राणी पहायला मिळतात. हे देखील खूप रोमांचक आहे.


बिबट्या भर गर्दीत एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो..
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्यावरून चालताना दिसत आहे. बिबट्याला पाहण्यासाठी रस्त्यावरही मोठी गर्दी झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्या भर गर्दीत एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो. हिमाचलमधील रस्त्यांवर अनेकदा बिबट्या दिसतात. स्थानिक लोकांसाठी ही एक सामान्य गोष्ट आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका स्थानिक व्यक्तीसोबत बिबट्या मस्ती करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बिबट्या वारंवार त्या व्यक्तीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, हा माणूस अतिशय सावधपणे उभा आहे.


 






नेटकऱ्यांना धक्का बसला


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे की एवढ्या मस्तीत बिबट्या कसा काय? हे व्यक्तीवर हल्ला देखील करत नाही आणि कोणत्याही प्रकारची भीती निर्माण करत नाही. खरंच हा व्हिडीओ खूपच आश्चर्याकारक आहे.


व्हिडिओ व्हायरल 


हा व्हिडिओ malik.afsaar या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. 11 जुलै रोजी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला 3 हजारांहून अधिक लोकांनी लाइकही केले आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सही अनेक कमेंट करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या