Lottery Winner : कुणाचं नशीब कधी उजळेलं काही सांगता येत नाही. श्रीमंत होण्यासाठी अनेक जण लॉटरी (Lottery)  काढतात. पण लॉटरी जिंकणं हे मात्र नशीबावर अबलंबून असतं. भारतासह (India), अमेरिका (America), ब्रिटन (Britain), आयर्लंड (Ireland) या देशांमध्ये लॉटरीचं मोठं वेड आहे. अनेक जण एक लॉटरी जिंकण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतात. तर काहीचं नशीब मात्र चांगलच उजळतं आणि त्यांना लॉटरी लागते. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. अमेरिकेतील एका महिलेला चक्क एकाच नंबरवर दोन वेळा लॉटरी लागली असून यामध्ये तिला 50 लाखांचं बक्षीस मिळालं आहे. 

Continues below advertisement


भगवान देता है तो छप्पर फाड के...
अमेरिकेतील एका महिलेचं नशीब चांगलच उजळलं, तिला एकाच नंबरवर दोन वेळा लॉटरी लागली. अमेरिकेच्या हयात्सविले येथील एका महिलेला मॅरीलैंड (Maryland) रेसट्रॅक वर्च्यअल हॉर्स रेसिंगमध्ये एकाच घोड्यावर डाव लावत दोन वेळा लॉटरी जिंकली आहे. या महिलेने दुसऱ्या डावात 30,946 डॉलर जिंकले. दोन्ही वेळी लॉटरीमध्ये या महिलेनं एकूण 49.34 लाख रुपये जिंकले आहेत. महिलेने लॉटरी जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त करत सांगितलं की, 10, 11 आणि 12 हे डावासाठीचे तिचे आवडते क्रमांक आहेत.


प्रत्येक आठवड्याला आजमावलं नशीब
एका रिपोर्टनुसार, ही महिला दर आठवड्याला घोड्यांच्या स्पर्धेत एक किंवा दोन लॉटरीवर डाव लावत स्वत:चं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करायची. यावेळी तिला लॉटरी लावण्यासाठी योग्य वेळ आहे असं वाटलं आणि तिने डाव लावला. 


स्पर्धेवर नव्हतं लक्ष
महिलेनं लॉटरीचं तिकीट घेतलं मात्र तिचं स्पर्धेवर लक्ष नव्हतं. स्पर्धेवेळी स्क्रिनवर तिच्या तिकीटाच्या नंबरला लॉटरी लागल्याचं दाखवण्यात येत होतं. पण या महिलेचं स्क्रिनकडे लक्ष नव्हतं, मात्र कॅशियरने महिलेनं लॉटरी जिंकली असल्याचं तिच्या निदर्शनात आणून दिलं. महिलेनं सांगितलंय की, लॉटरीमध्ये जिंकलेल्या या रकमेमध्ये नवीन घर बनवणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या