Laborer Son Left Great Khali Behind : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एक मजुराचा मुलगा त्यांची उंची आणि शरीरयष्टी यामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे या तरुणाने 'द ग्रेट खली'लाही मागे टाकलं आहे. या तरुणाची उंची रेसलर खलीहूनही जास्त आहे. उंची आणि भरभक्कम शरीर असणाऱ्या या तरुणाचा आहारही खूप आहे. एका वेळेला 18 चपात्या आणि अडीच लीटर दूध पिऊनही याची भूक शांत होत नाही आणि त्याला अर्धपोटी राहावं लागतं. पदवी शिक्षणानंतर भारतीय सैन्यात भरती व्हायची तरुणाची इच्छा आहे.


WWE रेसलर खलीलाही टाकलं मागे 


उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हमीरपूर (Hamirpur) जिल्ह्यातील मौधा भागात वसलेले इचौली नायकपुरवा हे गाव सध्या 'सिराज' या खलीसारख्या दिसणाऱ्या तरुणामुळे चर्चेत आहे. सिराजचे वडील शिपाही लाल मजूर म्हणून काम करतात. त्याचा घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. मात्र, काही जमीन त्यांच्या नावावर आहे. शिपाही लाल यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा सिराज 2019 मध्ये हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने इंटरमिजिएटचे शिक्षण घेतलं. यावर्षी तो पदवी शिक्षण घेत आहे. सिराज सध्या अठरा वर्षांचा आहे. पण सिराजने सुप्रसिद्ध खलीलाही मागं टाकल्याचं सांगितलं जात आहे.


एकट्याने उचलतो 90 किलो वजन


सिराजची उंची 7.2 फूट आहे. सिराजने उंचीच्या बाबतीत सुप्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू आणि WWE रेसलर खलीलाही मागे टाकल्याचं सांगितलं जात आहे. खलीची उंची 7.1 आहे. खलीपेक्षा सिराजची उंची 0.1 ने जास्त आहे. सिराजचं वजन 115 किलो आहे. त्याची छाती 110 सेमी आणि कंबर 40 इंच आहे. सिराजने सांगितलं की, कोणत्याही आधाराशिवाय तो एकटाच 90 किलो वजन उचलू शकतो. उंचीमुळे घरात प्रवेश करताना खूप वाकून जावे लागते.


सिराजची भूक भागत नाही


भरपूर आहार घेतल्यानंतरही सिराजची भूक भागत नाही. सिराजची आई श्यामा देवी यांनी सांगितले की, सिराज काही वर्षांपूर्वी दररोज दहा किलोमीटर धावत असे. त्यामुळे त्याची उंची वाढली आहे. तो एकटाच 18 रोट्या, अर्धा किलो गूळ, भात आणि भाजी खातो. त्यावर तो अडीच लिटर दूधही पितो. तो किलोभर मिठाईही फस्त करतो. यानंतरही त्याचे पोट भरत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Man Born with Uterus : बाहेरून पुरुष आतून स्त्री... 30 वर्षीय तरुणाच्या शरीरात आढळलं गर्भाशय; लग्नानंतर समोर आली धक्कादायक बाब