Viral Video: नुकतीच अमेरिकेतून (America) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अ‍ॅरिझोनामध्ये (Arizona) एका पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या हत्येचा (Murder) भयानक कट रचला. या जोडप्याच्या घटस्फोटाची केस (Divorce Case) कोर्टात सुरू आहे. पत्नीचे तिच्या पतीसोबत अनेकदा मतभेद होत होते. दरम्यान या भांडणाला कंटाळून तिने पतीच्या हत्येचा कट रचला.


मेलोडी फेलिकानो या 39 वर्षीय महिलेने अमेरिकन एअरफोर्समध्ये काम करणारा तिचा पती रॉबी जॉन्सन याच्या हत्येचा कट रचला. तिने रॉबीच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण ही सगळी घटना रॉबीने किचनमध्ये लावलेल्या गुप्त कॅमेरात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ समोर आला आहे. मेलोडीने अनेकदा रॉबीला मारण्याचा प्रयत्न केला.


पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट


गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. खरं तर, विवाह हे नातं विश्वास आणि प्रेम यावर आधारित असतं. पण नात्यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला काही अर्थ उरत नाही. मग ते नातं संपवण्यासाठी लोक टोकाचं पाऊल उचलतात, अशीच काहीशी घटना अमेरिकेत घडली आहे. आपसातील वादातून पत्नीने थेट नवऱ्याला संपवण्याचाच डाव आखला.


अमेरिकेत राहणाऱ्या मेलोडीचा पती रॉबी अनेकदा जर्मनी आणि अ‍ॅरिझोनामध्ये ड्युटीवर तैनात असायचा. या दरम्यान, त्याची पत्नी मेलडी हिने त्याच्या कॉफीमध्ये केमिकल मिसळण्याचा कट रचला. मेलोडीला वाटलं की तिचा हा डाव कधीच उघड होणार नाही. मात्र, तिचा नवरा रॉबी या बाबतीत अतिशय हुशार आणि सावध निघाला. त्याने किचनमध्ये गुप्त कॅमेरा बसवला होता, त्यामुळे ही संपूर्ण घटना या कॅमेऱ्यात कैद झाली. रॉबीला मार्च 2023 मध्ये जर्मनीत पोस्टींग मिळाली, तेव्हापासून पत्नी मेलोडी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळत होती.


अनेकदा कॉफीमध्ये मिसळलं ब्लीच


रॉबीला सुरुवातीला त्याच्या कॉफीच्या चवीत बदल झाल्याचा अंदाज आला, यानंतर त्याने कॉफीच्या नमुन्याची चाचणी घेण्याचा विचार केला. यासाठी त्याने लगेचच केमिकल टेस्टिंग स्ट्रिप्स विकत घेतल्या. जेव्हा त्याने कॉफी मेकरची कसून तपासणी केली तेव्हा त्याला आढळलं की, नळाचं पाणी सामान्य असलं तरी त्यात क्लोरीनचं प्रमाण जास्त आहे. क्लोरीनबद्दल समजल्यानंतर त्याला धक्काच बसला. हा सिलसिला बराच काळ सुरू असल्याचं त्याने सांगितलं. त्यांच्या पत्नीने कॉफीच्या भांड्यात अनेक वेळा केमिकस मिसळलं होतं.






प्रॉपर्टीसाठी पतीला संपवण्याचा कट


या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पत्नी कॉफी पॉटमध्ये ब्लीच मिसळताना दिसत आहे. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, रॉबी म्हणतो की त्याच्या पत्नीने त्याच्याकडून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी आणि पैशासाठी हे सगळं केलं आहे. ऑनलाईन रेकॉर्डनुसार, मेलोडीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तिच्यावरील आरोपांसाठी तिला $2,50,000 च्या बाँडवर तुरुंगात टाकण्यात आलं आहे.


हेही वाचा:


मुलाला इन्स्टाग्राम लाईव्हवर Avneet Kaur सोबत बोलणं पडलं महागात; आईने मागून येऊन जोरदार लगावली, व्हिडीओ व्हायरल