Trending News : सध्या, विमान वाहतूक उद्योग कोविड-19 महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीतून सावरत आहे. त्याचवेळी केरळमधील एक व्यक्ती स्वत: बनवलेल्या विमानातून कुटुंबासह युरोपला जात आहे. अशोक अलीसेरिल थामरक्षण असे या व्यक्तीचे नाव आहे. हे विमान अशोक अलिसेरिल थामरक्षण यांनी स्वतः बनवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील अलाप्पुझा येथील रहिवासी असलेल्या थामरक्षणला 4 सीटचे विमान तयार करण्यासाठी सुमारे 18 महिने लागले.


4 सीटर एअरक्राफ्ट मॉडेल


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 4 सीटर एअरक्राफ्ट मॉडेल 'Sling TSI' चे नाव 'G-Dia' ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये दिया त्यांच्या लहान मुलीचे नाव आहे. थामरक्षण 2006 मध्ये त्यांची पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी यूकेला गेले आणि सध्या फोर्ड मोटर कंपनीत काम करतात.



 या देशांत प्रवास केला


पायलटचा परवाना असलेल्या थामरक्षणने आतापर्यंत चार आसनी स्वयंनिर्मित विमानात कुटुंबासह जर्मनी, ऑस्ट्रिया आणि झेक प्रजासत्ताकला भेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, योग्य चार आसनी विमान शोधण्यात आलेल्या अडचणीमुळे त्यांना या विषयावर संशोधन करण्याची आणि लॉकडाऊनच्या काळात घरगुती विमानांबद्दल जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली.