Mumbai Viral Video : काळजाला स्पर्श करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मग तो सुखाचा असो, दुखाचा असो, डेअरिंग करणारा, थेट काळजाला भिडणारा व्हिडीओ मनात घर करुन राहतो. असाच एक बाप-लेकीच्या प्रेमाचा व्हिडीओ अनेकांनी शेअर केलेला दिसतोय. हा व्हिडीओ मुंबईच्या लोकल ट्रेनमधील (Local Train) आहे. या व्हिडीओमध्ये बाप आणि लेकीचं निखळ प्रेम दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
वडीलांचं आपल्या मुलापेक्षा मुलीवर अधिक प्रेम असतं असं म्हटलं जातं. बाप-लेकीचं नात हे सर्वात गोड नातं असतं. याचाच प्रत्येय या व्हायरल व्हिडीओतून येतोय. मुंबई लोकलमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन दरवाजाशेजारी बसला आहे. हा व्यक्ती रोजंदारी करणारा दिसतोय. त्याचा पेहराव पाहता आर्थिक स्थिती लगेचच आपल्या लक्षात येते. पण या व्हिडीओमध्ये तुम्ही जो क्षण पाहताय तो क्षण वाट्टेल तितका पैसा खर्च केला तरी खरेदी करू शकत नाही. लहान मुलगी प्रेमाने आपल्या वडिलांना वेफर्स भरवतेय. ही मुलगी साधरणापणे एक-दोन वर्षांची असेल. पण, इतक्या लहान वयातही ती आपल्या वडिलांची काळजी घेताना दिसतेय. मुंबईच्या लोकल ट्रेनमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
संकीसाक्षी नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बाप-लेकीच्या प्रेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या पोस्टवर लाखो लोकांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. निखळ प्रेमाचा हा व्हिडीओ सध्या अनेकांच्या मनाचा ठाव घोतोय.