Kartik Aaryan: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या 'शहजादा' (Shehzada) चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. कार्तिक आणि क्रितीच्या या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर गर्दी जमवण्यास सुरुवात केली आहे. दोघेही 'शेहजादा'साठी खूप उत्सुक आहेत आणि त्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या तेलुगु हिट 'अला वैकुंठापुरमुलू'चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात पूजा हेगडेचीही भूमिका होती. शुक्रवारी (17 फेब्रुवारी) कार्तिक (Kartik Aaryan) त्याच्या चित्रपटाच्या रिलीजनंतर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. एकीकडे कार्तिक मंदिरात दर्शन घेत असताना दुसरीकडे त्याच्या लॅम्बोर्गिनी कारचे पोलिसांनी चलान कापले.






'शहजादाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करू शकत नाही'


कार्तिकला (Kartik Aaryan) दंड ठोठावल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी त्याच्या गाडीचा फोटो ट्वीट केला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,  "प्रॉब्लेम हा आहे की, कार चुकीच्या दिशेने पार्क केली गेली होती. तुम्ही अशी चूक कधीही करू नका आणि 'शहजादा' वाहतूक नियमांचे उल्लंघन करू शकतो, असा कधीही विचार करू नका.''


पोलिसांनी (Mumbai Police) या कारचा फोटो शेअर करताना नंबर प्लेट ब्लर केली आहे. मात्र तरीही कारचा नंबर स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मुंबई पोलिसांनी कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) चित्रपटांचे नाव आणि संवाद सामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वापरले आहेत. असं असलं तरी पोलिसांनी हा फोटो शेअर करताना कार्तिक आर्यन याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. 


Kartik Aaryan Shehzada: मंदिराच्या आतील फोटो केला शेअर 


कार्तिकने (Kartik Aaryan) त्याच्या इंस्टाग्रामवर मंदिराच्या आतील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो बाप्पाच्या मूर्तीसमोर डोकं टेकवत असल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, 'गणपती बाप्पा मोरया.'