Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी आणखी दोन फरार आरोपींना अटक केली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडिया इल्फ्यून्सर सपना गिलला (Sapna Gill) अटक केली होती. आता आणखी दोन फरार आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. ओशिवरा पोलिसांनी दोन संशयित आरोपींना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर आता या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरुन वाद 


मीडिया रिपोर्टनुसार, पृथ्वी शॉच्या मित्रांकडून ओशिवरा पोलिसांत हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर ओशिवरा पोलिसांनी कारवाई करत आता सपना गिलनंतर दोन फरार आरोपींना अटक केली आहे. पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला होता. हा वाद नंतर हाणामारीवर पोहोचला. सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी पृथ्वी शॉ आणि मित्रांवर हल्ला केल्याचा आरोप पोलिसात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.


पृथ्वी शॉसोबतच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल


भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वी शॉचा आणि एका तरुणीचा बाचाबाचीचा व्हिडीओ समोर आला होता. मुंबईतील एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ आणि काही जणांमध्ये बाचाबाची झाली. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शॉ एका महिलेसोबत भररस्त्यात बाचाबची करताना दिसत होते. पृथ्वी शॉ आणि तरुणी यांच्यात बाचाबाची झाली होती. या प्रकरणी आता नवी अपडेट समोर येत आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ : 






काय आहे प्रकरण?


मीडिया रिपोर्टनुसार, क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरुन वाद झाला. यानंतर पृथ्वी शॉवर सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी हल्ला केला होता. इतकंच नाही तर त्याच्या कारच्या काचाही फोडल्या. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सपना गिलला अटक देखील केली. सपना गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर दो लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Prithvi Shaw : पृथ्वी शॉसोबत बाचाबाची करणाऱ्या सपना गिलला पोलिसांनी केली अटक, सेल्फीवरुन झालेला वाद विकोपाला