Railway Rules For Ticket Booking : रेल्वे ही सर्वसामान्य भारतीयांसाठी जीवनदायिनी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण रेल्वेच्या माध्यमातून लांब पल्ल्याचा प्रवास तोही अगदी स्वस्तात आणि आरामदायी होऊ शकतो. त्यामुळेच भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यासाठी रेल्वेकडून हजारो गाड्या चालवल्या जातात. रेल्वे प्रवास अतिशय आरामदायी आणि सोयीचा आहे. त्यामुळे बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वेने प्रवास करणारे बहुतेक लोक आरक्षण करून प्रवास करणे पसंत करतात.


आरक्षित डब्यांमध्ये लोकांना अनेक सुविधा मिळतात. रेल्वेने तिकीट बुकिंगबाबत काही नियमही ठरवले आहेत. रेल्वेच्या आरक्षणासंबंधी सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यातल्या त्यात ग्रुपने आरक्षण करताना त्याचे नेमके नियम काय हे अनेकांना माहिती नसतात. समजा जर चार जणांनी मिळून ट्रेनचे तिकीट काढले असेल आणि त्यापैकी तीन तिकीट कन्फर्म झाली असतील आणि एक तिकीट वेटिंगवर असेल तर काय? वेटिंगवर असलेल्या त्या प्रवाशाला प्रवास करता येतो की नाही? त्यासंबंधी नियम काय सांगतो हे जाणून घेऊयात. 


वेटिंग तिकीट प्रवासी देखील प्रवास करू शकतात


जर एकाच PNR वर चार प्रवाशांची तिकिटे बुक केली असतील तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. त्या चार पैकी तीन प्रवाशांची तिकिटे कन्फर्म झाली आहेत आणि एका प्रवाशाचे तिकीट वेटिंग राहिले तर अशा स्थितीत अर्धवट कन्फर्म तिकिटाचा नियम चौथ्या प्रवाशाला लागू होतो.


म्हणजे इतर तीन प्रवासी तिकीट कन्फर्म असल्याने चौथ्या प्रवाशाचे तिकीट रद्द होत नाही. त्या तिकिटावर तो प्रवास करू शकतो. मात्र, तिकीट कन्फर्म नसल्याने त्यांना जागा मिळणार नाही. पण प्रवासात नंतर इतर कोणतीही सीट रिकामी झाली तर टीटीई त्याला ती जागा देऊ शकतो.


एक पुष्टी तीन प्रतीक्षा वर समान नियम


जर चार प्रवाशांनी एकत्र तिकीट काढले असेल आणि त्यापैकी फक्त एकाचे तिकीट कन्फर्म झाले आहे आणि इतर तिघांचे नाही तर त्यासाठी नियम काय? तर या परिस्थितीतही वरील नियम लागू होतो. म्हणजे उर्वरित तीन प्रवाशांच्या तिकिटांवरही हाच नियम लागू होतो. एका प्रवाशाला सीट मिळते. उर्वरित तीन प्रवाशांना जागा मिळत नाही. प्रवासात नंतर ट्रेनमध्ये कोणतीही सीट रिकामी झाल्यास तर त्या तिघांना जागा मिळू शकते.


ही बातमी वाचा: