Newborn Babies: जेव्हा घरी एक लहान पाहुणा येणार असल्याची बातमी मिळते तेव्हा घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येतं. तो छोटासा पाहुणा घरात आला की घरात आनंद, उत्साह आणि नवचैतन्य येते. प्रत्येक जण घरी आलेल्या त्या छोट्या बाळाची कामं करण्यात आणि कौतुक करण्यात त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात. जेव्हा जेव्हा कोणी लहान मुलाला आपल्या मांडीवर देतात. तेव्हा त्याला ते काळजीपूर्वक हाताळण्यास सांगितले जाते, त्याला सोडू नका आणि मोठा आवाज करू नका. कदाचित तुम्हाला यामागचे कारण देखील माहित नसेल. त्यामागची कारणं जाणून घेऊयात.
नवजात बाळाला सर्वात जास्त दोन गोष्टींची भीती वाटते. पहिली म्हणजे मोठ्या आवाजाची भीती आणि दुसरी पडण्याची भीती. म्हणूनच मुल लहान असताना, लोक घरात मोठा आवाज करणे टाळतात आणि त्याला आपल्या मांडीवर काळजीपूर्वक धरतात. मोठा आवाज लहान मुलांच्या मेंदूला थेट चालना देतो आणि ते घाबरतात, लगेचच रडू लागतात. याशिवाय, नवजात मुलाला पालकांपासून वेगळे होण्याची भीती देखील असते. खरं तर, जेव्हा मुलं लहान असतात, तेव्हा ते सुरक्षित आणि आरामदायक वाटण्यासाठी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात.
अचानक होणाऱ्या हालचालींची भीती
नवजात बाळाला अनोळखी लोकांची भीती वाटते. अनोळखी लोक त्यांच्यासाठी विचित्र आणि भयानक असू शकतात. काही लहान मुलांना अंधाराची भीती वाटते. नवजात बाळांना अचानक होणाऱ्या हालचालींची भीती वाटू शकते, कारण त्यांना त्यांच्या जगाची अद्याप जाणीव नसते. नवजात मुलांना त्यांच्या पालकांशिवाय इतर कोणाशीही सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे त्यांना असुरक्षिततेची भीतीही वाटते.
लहान मुलं अगदी छोट्या आवाजालाही घाबरतात
मुलांच्या बाबतीत घडणारी कोणतीही छोट्या गोष्टींना ते घाबरू शकतात. खरे तर लहान मुलांचे मन खूप नाजूक असते आणि ते इतके लहान असतात की त्यांना अजून काहीच समजत नाही. यामुळे लहान मुलं लहान आवाजातही घाबरू लागतात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीने त्यांना उचलले तर ते घाबरतात. त्यामुळे लहान मुले त्यांच्या पालकांच्या जवळ राहतात.