Job Opportunity: तुमच्या घरात काम करणाऱ्या कामवाल्या बाईला किंवा मुलांची काळजी घेणाऱ्या आयाला पगार (Salary) म्हणून तुम्ही किती पैसे द्याल? जर त्यांनी 10 ते 20 हजार रुपये मागितले तरी कदाचित तुम्हाला ते द्यायला जड जाईल.


पण, एका भारतीय-अमेरिकन अब्जाधीशाने आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी देऊ केलेली आयाची नोकरी पाहून तुम्ही थक्क व्हाल, कारण यात तुम्हाला लाखोंमध्ये पगार (Salary) मिळणार आहे. केवळ पगारच नाही तर ही नोकरी मिळाली तर तुम्ही किती 'श्रीमंत' आहात, अशी भावना तुमच्या मनात जागृत होईल.


नेमका किती पगार मिळणार?


तर आम्ही अमेरिकेतील रिपब्लिकन इलेक्टोरल पार्टीचे संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांच्याबद्दल बोलत आहोत. EstateJobs.com या अमेरिकन जॉब एजन्सीद्वारे त्यांनी आयासाठी जाहिरात दिली आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी आयाची गरज असल्याचं या जाहिरातीत म्हटलं आहे. या नोकरीसाठी पगार म्हणून 1,00,000 डॉलर्स (सुमारे 83 लाख रुपये) दिले जातील. भारतीय-अमेरिकन अब्जाधीशांनी आपल्या घरगुती कामातील कर्मचारी वाढवण्यासाठी ही जाहिरात दिली आहे, ज्यामध्ये आयाचं पद सध्या रिक्त आहे.


जाहिरातीत अजून काय खास?



  • उच्च-प्रोफाइल कुटुंबाशी कनेक्ट होण्याची आणि काम करण्याची संधी.

  • दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी लाखोंचा पगार.

  • कौटुंबिक साहसात सहभागी होण्याचीही संधी मिळेल.

  • श्रीमंत कुटुंबासोबत राहण्याची आणि त्यांच्यासोबतवास करण्याची संधी.

  • नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय किमान 21 असावं.


प्रायव्हेट जेटमधून फिरण्याची संधी


या आयाच्या नोकरीसाठी निवडलेल्या व्यक्तीला दर आठवड्याला कुटुंबासह खासगी जेटमध्ये प्रवास करण्याची संधीही मिळणार आहे. असं महिन्यातून अनेक वेळा होऊ शकतं, कारण रामास्वामी यांचे कुटुंबीय अनेकदा प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. या कुटुंबात केवळ आयाच काम करत नाहीत, तर शेफ, हाऊसकीपर्स आणि खाजगी सुरक्षेसह घरगुती मदतनीसांचा मोठा स्टाफ देखील आहे.


एक आठवडा काम, एक आठवडा विश्रांती


या नोकरीसाठी निवडलेल्या व्यक्तीला साप्ताहिक रोटाप्रमाणे काम करावं लागेल. साप्ताहिक रोटा म्हणजे तुम्हाला एक आठवडा काम करावं लागेल आणि एक आठवडा सुट्टी मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला एका वर्षात फक्त 26 आठवडे काम करावं लागेल, ज्याचा पगार सुमारे 1 लाख डॉलर असेल. रामास्वामी कुटुंबात 2 मुलं आहेत. एकाचं वय 3.5 वर्षे आणि दुसऱ्याचं 1 वर्ष आहे. मुलांकडे लक्ष देणं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं हे आयाचं काम असतं.


हेही वाचा:


धक्कादायक VIDEO: सुपरमार्केटमध्ये चॉकलेटसाठी फ्रीजचा दरवाजा उघडला; चिमुकलीचा शॉक लागून दुर्दैवी अंत