City of Light: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध राज्यांत राहणाऱ्या लोकांपासून ते शहरांपर्यांत सर्वच गोष्टींमध्ये विविधता आहे. भारतातील विविध शहरांच्या टोपणनावांशी तुम्ही परिचित असाल. भारतीय शहरं त्यांच्या मूळ नावासह इतर अनेक नावांनी ओळखली जातात आणि या नावांमागे एक खास बाब असते. आज भारतातील (India) अशाच एका नवीन शहराबद्दल जाणून घ्या, ज्याला 'City of Light' असंही म्हटलं जातं. देशातील हे शहर प्रकाशासाठी प्रसिद्ध आहे.
कोणतं आहे हे शहर?
उत्तर प्रदेशातील वाराणसी (Varanasi) शहराला 'City of Light' म्हणूनही ओळखलं जातं. प्रकाशमय शहर असलेलं वाराणसी हे राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. भारतीय इतिहास (History), संस्कृती (Culture) आणि परंपरा (Tradition) यांच्या संगमामुळे या शहराला प्रकाशमय शहर म्हटलं जातं. या शहरातील धार्मिकता, येथील शिक्षण, ज्ञान, संस्कृती आणि यात्रेकरू अशी बरीच कारणं या शहराच्या नावामागे आहेत. वाराणसी घाटावरील दिव्यांच्या लखलखाटामुळे या शहराला ‘City of Light’ असं नाव पडलं.
या शहराला ‘City of Light’ का म्हणतात?
वाराणसीला काशी असंही म्हणतात, ज्याचा अर्थ 'चमकणारा' असा आहे. हा शब्द महाभारतासारख्या महाकाव्यांमध्ये प्रचलित असून 'काश' या संस्कृत शब्दापासून बनला आहे. याशिवाय शिवनगरीच्या रुपात असलेल्या या शहरातील घाट दिव्यांनी उजळून निघतात, त्यामुळे या शहराला ‘City of Light’ असेही म्हणतात.
वाराणसीमध्ये आहे नद्यांचा संगम
वाराणसी हे गंगा नदीच्या (Ganga River) काठावर वसलेलं शहर आहे आणि येथे गंगा नदीत वरुणा आणि असी नदीचा संगम आहे. या गंगा नदीकाठी रोज संध्याकाळी महाआरती होते, पुजारी लखलखते दिवे घेऊन पंचारती करतात आणि यामुळेच वाराणसी प्रकाशांचं शहर म्हणूनही प्रसिद्ध झालं आहे. भारतातील विशेष शहर म्हणून वाराणसीचं महत्त्व अनमोल आहे, जे प्रकाश आणि धार्मिकतेच्या तेजाशी संबंधित आहे.
धार्मिक नगरी
सध्या हे शहर वाराणसी म्हणून ओळखलं जातं, परंतु त्याचं जुनं नाव काशी आहे. या शहरातील संस्कृती, ज्ञान, धर्म आणि परंपरा यांच्या एकत्रीकरणातून बनारस या शब्दाची उत्पत्ती झाल्याचं काही सिद्धांत सांगतात. या शहराचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचं एकत्रीकरण या शहराला खास बनवतं.
हेही वाचा:
India Roads: 'हे' आहेत भारतातील सर्वात धोकादायक रस्ते; छोटीशी चूक ठरेल थेट मृत्यूला कारणीभूत!