मुंबई: आपण नेहमीच जादुगरांची जादू पाहतो, आपल्या न कळत ते हातच्या चलाखीने जादू करतात. कितीही वेळा लक्षपूर्वक पाहिलं तरी त्यांची हातचलाखी आपल्या नजरेत येत नाही. ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion Photo) हा त्यातलाच एक प्रकार. ऑप्टिकल इल्यूजनमध्ये आपल्याला दिसतं एक आणि असतं भलतंच, जे आपण सहज पाहू शकत नाही. यावेळी आपले डोळे धोका खातात आणि आपण फसले जातो. या ऑप्टिकल इल्यूजनमधला हत्तींचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये पाण्यामध्ये नेमके किती हत्ती आहेत हेच लक्षात येत नाही. विशेष म्हणजे 99 टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलं आहे.


डोक्याला शॉट देणारी आणि कन्फ्युजन वाढवणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये काही हत्ती हे पाणवठ्याच्या काठी पाणी पिताना दिसत आहेत. वरवर पाहता त्यामध्ये चार हत्ती दिसतात, तीन मोठे हत्ती आणि त्यांचं एक पिल्लू. पण खरंतर त्यामध्ये चार पेक्षा जास्त हत्ती आहेत. 




हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यास सर्वांचं उत्तर हे चारच हत्ती आहेत असंच आहे. ऑप्टिकल इल्यूजन प्रकारचा हा फोटो असल्याने उत्तर काही वेगळंच आहे. काही लोकांनी दावा केलाय की यामध्ये पाच हत्ती आहेत, तर काहींनी सहा, सात आणि आठ हत्ती असल्याचा दावाही केलाय. हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांना या हत्तींच्या संख्येचं कोडं सुटत नाही. 


How Much Elephants In Picture: हत्ती नेमके किती आहेत? याचं उत्तर आहे..... 


हत्तींच्या या फोटोंवर अनेक वेगवेगळे दावे केले जात असले तरी काही लोकांनी शक्कल लढवली आहे आणि त्यांचंच उत्तर खरं असल्याचा दावा केला आहे. बारीक निरीक्षण केलं असता या फोटोंमध्ये सात हत्ती असल्याचं सांगितलं जातंय. पण हे सात हत्ती नेमके कुठे दिसतायत हाच अनेकांना प्रश्न पडला आहे. 


Optical Illusion Photo: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल 


सोशल मीडियावर सध्या वेगवेगळे चॅलेंज दिले जात आहेत. त्यामध्ये ऑप्टिकल इल्यूजन प्रकारातल्या फोटोंचे चॅलेन्ज मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतंय. चित्रातल्या मांजरांची संख्या किती, चित्रातील व्यक्तींची संख्या किती किंवा अशा प्रकारचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात. तसेच बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स, सुप्रसिद्ध राजकारणी, सेलिब्रेटी यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि त्यांची ओळख सांगा असे प्रश्न विचारले जातात. अशा या फोटोंवर लाखो कमेंट्स येत असल्याचं दिसून येतंय.