मुंबई : दरवर्षी लाखो पर्यटकांना परदेशात भेट द्यायला आवडते. यामध्ये सिंगापूरचे नाव आघाडीवर आहे. भारतीय केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सिंगापूरला जात नाहीत, तर मोठ्या संख्येने भारतीय नोकरी आणि व्यवसायाच्या शोधातही येथे जातात. पण आज संपूर्ण जगाला आकर्षित करणारा सिंगापूर एकेकाळी खूप गरीब देश होता. त्या देशाने आज विकासाच्या क्षेत्रात इतकी मोठी भरारी घेतली आहे की श्रीमंतांच्या यादीतही तो देश आघाडीवर आहे. त्या देशात श्रीमंत नागरिकांची संख्याही भलीमोठी आहे. 


History Of Singapore : सिंगापूरचा इतिहास काय? 


सन 1963 मध्ये सिंगापूर स्वतंत्र झाला तेव्हा येथे खूप गरिबी होती. इतर आशियाई देशांप्रमाणे सिंगापूरही दीर्घकाळ ब्रिटनची वसाहत होती. पण सिंगापूर हा स्वतंत्र देश झाल्यावर त्याने आपल्या देशाला विकासाकडे वेगाने नेले. सिंगापूर आज जिथे आहे त्याचे श्रेय पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना दिले जाते.


Rich Countries List : समृद्ध देशांच्या यादीत आघाडीवर


आता सिंगापूरची गणना श्रीमंत देशांमध्ये होत आहे. जिथे प्रत्येक सहावे कुटुंब करोडपती आहे. दरडोई जीडीपीच्या बाबतीत, यूके, फ्रान्स आणि अगदी अमेरिकेसारख्या महासत्तांपेक्षाही पुढे आहे. 2030 पर्यंत या देशात जगातील सर्वाधिक करोडपती असतील असा अंदाज आहे.


सिंगापूर कसा बदलला?


जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीसह सिंगापूरनेही विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पहिल्या दोन दशकांमध्ये सिंगापूरची अर्थव्यवस्था दरवर्षी सुमारे 10 टक्के दराने वाढली. पूर्वी सिंगापूर मसाले, कथिल आणि रबरचा व्यापार करत असे. नंतर ते औषधी उत्पादनातही व्यवसाय करू लागले. 1975 पर्यंत सिंगापूरने एक मोठा औद्योगिक तळ स्थापन केला होता. 1965 मध्ये जीडीपीमध्ये उत्पादनाचा हिस्सा 14 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत वाढला.


कोट्यधीशांची संख्याही मोठी


आज सिंगापूरमधील बहुतेक लोक श्रीमंत आहेत. सिंगापूर सरकारच्या मते, 2023 पर्यंत सिंगापूरमध्ये स्वत:चे घर खरेदी करणाऱ्या लोकांची टक्केवारी 100 पैकी 89.7 आहे. लवकरच हा आकडा 100 टक्क्यांपर्यंत पोहोचेल आणि काही वर्षांत येथे कोट्यधीशांची संख्याही इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असेल. 


ही बातमी वाचा: