मुंबई : रोज कुठे ना कुठे जंगली जनावर मानवी वस्तीवर हल्ला करतात, मानवावर हल्ला करतात अशा बातम्या येत असतात. ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे अशा म्हणजे आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ ते उत्तर प्रदेश आणि डोंगराळ राज्यांमध्ये हत्ती, वाघ आणि बिबट्या माणसांवर हल्ला करतात. आपल्या राज्यातली अनेक ठिकाणी बिबट्या किंवा वाघ माणसांवर हल्ला करतात आणि त्यांचा जीव घेतात. सध्या उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये नरभक्षक लांडग्यांची दहशत आहे. त्याने आतापर्यंत 9 मुलांसह एका महिलेला आपला बळी बनवले आहे.


लांडगा, वाघ किंवा इतर कोणताही वन्य प्राणी मानवभक्षक कसा बनतो हे तुम्हाला माहीत आहे का? एखादा प्राणी मनुष्यभक्षक कसा बनतो हे आपण जाणून घेऊयात. 


आदमखोर हा अरबी-पर्शियन शब्द 


मनुष्यभक्षक या मराठी शब्दाला हिंदीमध्ये आदमखोर असं म्हणतात. हा मूळचा अरबी-पर्शियन शब्द आहे. अरबी शब्द 'आदम' आणि पर्शियन शब्द 'खोर' यापासून तो बनलेला आहे. याचा अर्थ 'माणूस खाणारा' असा होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाला खाणारा किंवा माणसांना आपला शिकार बनवणाऱ्या प्राण्यासाठी हा शब्द वापरला जातो.


वन्य प्राणी मानवभक्षक कधी होतो?


कोणताही वन्य प्राणी मानवभक्षक कधी होतो? लांडगा, वाघ, बिबट्या यासह इतर प्राण्यांच्या तोंडाला मानवी रक्त लागल्यावर त्यांना मानवी रक्ताची चटक लागते. असा मानवभक्षक प्राण्यांना पुन्हा भूक लागते तेव्हा ते इतर गोष्टींची शिकार करण्याऐवजी मानवाची शिकार करण्याचा प्रयत्न करतात.


शिकार न मिळाल्यास प्राणी बनतात मानवभक्षक


जेव्हा या क्रूर प्राण्यांना जंगलामध्ये त्यांची शिकार सापडत नाही तेव्हा ते मानवभक्षक बनतात. वनविभागाच्या माहितीनुसार, सिंह, वाघ, लांडगा यांसारखे वन्य प्राणी जेव्हा जंगलात पुरेसे अन्न मिळत नाही तेव्हाच मानवी वस्तीवर हल्ला करतात. 


मुलांची शिकार करणे सोपे 


जंगली प्राण्याने एकदा का माणसांचे मांस खाल्ले तर त्याला ते अधिक आवडू लागतं. त्यामुळे ते मानवी वस्तीवर हल्ला करतात. पण मोठ्या माणसांवर हल्ला करण्यापेक्षा ते लहान मुलांवर हल्ला करण्याचा अधिक प्रयत्न करतात. तसं करणे त्यांना सोपं पडतं म्हणूनच ते मुख्यतः मुलांना लक्ष्य करतात.


ही बातमी वाचा: