Hong Kong Free Air Ticket Offer : परदेशात फिरण्याची अनेकांची इच्छा असते. पण, सातासमुद्रापार परदेश वारी करण्याची इच्छा अनेकांसाठी फक्त स्वप्नचं ठरतं. परदेशात प्रवास म्हणजे खर्चिक बाब. त्यामुळे अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं नाही. सर्वसामान्यांसाठी तर ही बाब जवळजवळ अशक्य ठरते. काही निवडक लोकांनाच परदेशात फिरण्याची संधी मिळते, कारण सर्वांनाच खर्च शक्य नसतो. पण, जर तुम्हाला परदेशात जाण्यासाठी मोफत एअर तिकीट मिळालं तर... एक देश पाच लाख फ्लाईट तिकीट मोफत देत आहे. 


'या' देशाची भन्नाट ऑफर


हाँगकाँगने (Hong Kong) आपल्या पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने भन्नाट ऑफर आणली आहे. येथे परदेशी प्रवाशांना येथे आमंत्रित करण्यासाठी मोफत हवाई तिकिट देण्यात येत आहेत. हाँगकाँग देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून या देशातील पर्यटन व्यवसायात घट झाली आहे. त्यामुळे देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.


कोरोनाकाळात हाँगकाँगमधील पर्यटनात घट झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. हाँगकाँग देशातील व्यवसाय आणि आर्थिक उलाढाल सर्वाधिक पर्यटनावर टिकून आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा पर्यटनात वाढ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर हाँगकाँग आता 'हॅलो हाँगकाँग' (Hello Hong Kong) ऑफर आणली आहे. यामध्ये हाँगकाँगमध्ये प्रवास करण्यासाठी विमान प्रवासाची पाच लाख मोफत तिकीट देण्यात येणार आहेत.


हाँगकाँगच्या ऑफर मागचं कारण काय? 


या योजनेंतर्गत प्रवाशांना पाच लाख विमान तिकीटांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हाँगकाँगमधील अधिकारी जॉन ली का-चिऊ यांनीही गेल्या गुरुवारी या मोहीमेची घोषणा केली. फोर्ब्सच्या अहवालात हाँगकाँग विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार सांगण्यात आलं आहे की, कोरोना महामारीच्या काळात आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवून विमान कंपन्यांना सरकारी मदत म्हणून पॅकेज देण्यात आलं होतं. विमान कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही तिकिटे खरेदी करण्यात आली होती. ही तिकीटे सरकार मोफत वाटप करणार आहे.


कसं मिळेल मोफत तिकीट?


अहवालानुसार, पाच लाख तिकिटांची एकूण किंमत 255 डॉलर दशलक्ष आहे. भारतीय चलनात ही रक्कम 20 अब्ज 96 कोटी 95 लाख 42 हजार 500 रुपये आहे. ही तिकीटे कॅथे पॅसिफिक, एचके एक्सप्रेस आणि हाँगकाँग एअरलाइन्सद्वारे दिली जातील. फोर्ब्सच्या अहवालानुसार, हाँगकाँगला जाण्याची इच्छा असलेले प्रवासी 1 मार्चपासून hongkongairport.com वेबसाईटवर World of Winners नावाच्या लॉटरीसाठी स्वतःची नोंदणी करू शकतात.


या मोफत तिकीटांचे वाटप तीन टप्प्यात केले जाणार आहे. 1 मार्च ते 1 एप्रिल या काळात दक्षिण पूर्व आशियातील लोकांना या मोहिमेचा लाभ घेता येईल. यानंतर 1 मे पर्यंत चीनमध्ये राहणाऱ्या लोकांना संधी मिळेल. उन्हाळ्यात, हाँगकाँगमधील रहिवाशांना 80,000 आणि ग्रेटर बे एरियामध्ये राहणाऱ्यांना 80,000 मोफत विमान तिकिटे दिली जातील. काही रिपोर्ट्सनुसार, तुम्हाला मोफत हवाई तिकीटांची लॉटरी लागली तर तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची व्यवस्था करावी लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Unique Jobs : जगातील सर्वात अनोख्या नोकऱ्या; फक्त झोपा काढण्यासाठी, टीव्ही पाहण्यासाठी मिळेल गलेलठ्ठ पगार