Unique Jobs in World : 'कोई काम छोटा या बडा नही होता...' हा प्रसिद्ध बॉलिवूडचा डायलॉग तुम्ही ऐकलाच आहे. लोक पैसे कमवण्यासाठी दिवसभर मेहनत करतात. काहीजण दिवसभर काबाडकष्ट करतात घाम गाळून उदरनिर्वाह करतात. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत. काही नोकऱ्या ज्या फार मजेदार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काही न करण्यासाठीही पगार दिला जातो. फक्त झोपा काढण्यासाठी आणि टीव्ही पाहण्यासाठीही गलेलठ्ठ पगार मिळतो. 


मिठी मारण्याचे काम


लोकांना मिठी मारून ते पैसे कमवतात. मिसी रॉबिन्सन क्लायंटला मिठी मारण्यासाठी एका रात्रीसाठी 1.5 लाखांपेक्षा जास्त शुल्क आकारतात. मिसी रॉबिन्सन एक मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि ऑस्ट्रेलियातील परवानाधारक कडल थेरपिस्ट आहेत. 


काहीही न करता पैसे मिळवा


जिथे लोक दिवसभर घाम गाळून पैसे कमवतात तिथे जपानमधील एक व्यक्ती काहीही न करता पैसे कमवतो. लोक त्याला काहीही न करता कामावर घेतात. काहीही न करता तो त्यांच्यासोबत फक्त वेळ घालवतो, फिरतो, खातो-पितो आणि त्यांचे बोलणे ऐकतो. या कामासाठी लोक त्यांना पैसेही देतात.


झोपण्यासाठी आणि टीव्ही पाहण्यासाठी मिळतात पैसे


आपल्याकडे घरात गरजेपेक्षा जास्त वेळ झोपल्यावर आई-वडील आपल्याला ओरडू लागतात आणि लवकर उठण्याचे फायदेही सांगतात. पण दुसरीकडे जगातील एक कंपनी फक्त झोपण्यासाठी लोकांना कामावर ठेवते. लग्झरी बेड कंपनी क्राफ्टेड बेड्स लोकांना त्यांच्या फर्निचरच्या चाचणीसाठी कामावर ठेवते. ज्यामध्ये त्यांना दिवसातील सुमारे 6 तास बेडवर झोपावे लागते, कंपनी टाइमपास करण्यासाठी टीव्ही पाहण्याची व्यवस्था देखील करते आणि त्यासाठी त्यांना मोबदला दिला जातो.


ग्रंथपाल


या नोकरीसाठी तुमचं कामावर खूप लक्ष असणे आवश्यक आहे. पुस्तके किंवा इतर साहित्य त्यांच्या योग्य ठिकाणी आहेत आणि कोणत्याही वस्तूचा वापराची योग्यरित्या नोंद झाली आहे का हे पाहावे लागले. सुरुवातीला तुम्हाला 20 ते 30 हजार दरमहा पगाराची नोकरी मिळू शकते. दरम्यान, लायब्ररी सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि अनुभव असल्यास तुम्हाला ग्रंथपालाच्या नोकरीसाठी चांगला वार्षिक पगार मिळू शकतो.


व्हॉईस आर्टिस्ट


जर तुमच्याकडे एक अनोखी आवाजाची कला असेल किंवा तुम्ही वेगवेगळे आवाज काढण्यात पटाईत असाल, तर व्हॉइस आर्टिस्ट बनून तुम्ही कोणतीही मेहनत न करता केवळ तुमच्या आवाजाच्या जोरावर चांगले पैसे कमवू शकता. जाहिराती, व्हिडीओ गेम्स, टेलिव्हिजन किंवा चित्रपटात व्हॉईस-ओव्हर करून तुम्ही चांगला पगार मिळवू शकता. हे एक मजेदार काम आहे, तसेच यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. व्हॉइस आर्टिस्टची कमाई तासांच्या आधारे ठरवली जाते. यामध्ये तुम्ही सुमारे 1500 ते 5000 रुपयांपर्यंत प्रति तास करु शकता.


टेप ऑपरेटर


हे काम अगदी सोपे आहे. तुम्हाला रात्रंदिवस एका खोलीत टेपचा डबा घेऊन बसावे लागेल आणि डिजिटल कॉपी सर्व्हरवर टाकत राहावे लागेल. ही नोकरी अर्धवेळ आणि पूर्ण वेळ दोन्ही करता येते. पगाराबद्दल बोलायचे झाले तर यासाठी कंपनी तुम्हाला 35 डॉलर म्हणजेच सुमारे 2800 रुपये प्रति तास किंवा त्याहून अधिक देते.


आइस्क्रीम टेस्टर


आईस्क्रीम चाखाण्यासाठी पगार मिळतो. कंपनीत तयार होणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आइस्क्रीमचे योग्य साहित्य, पोत आणि चव याची ते काळजी घेते, ज्यामुळे आइस्क्रीम खाणारा निराश होणार नाही. याशिवाय आइस्क्रीम टेस्टरलाही नवीन फ्लेवर्स शोधून काढावे लागतात. यासाठी 28 लाख ते 78 लाखांपर्यंत वार्षिक वेतन मिळू शकते.


फूड स्टायलिस्ट


जाहिरातींमध्ये चांगले दिसणारे अन्नपदार्थ पाहताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. फोटोशूट, चित्रपट, जाहिराती आणि महागड्या रेस्टॉरंट्ससाठी खाद्यपदार्थ आकर्षक दिसणे हे फूड स्टायलिस्टचे काम असते. यामुळे अन्नपदार्थ पाहणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटते. फूड स्टायलिस्टचा वार्षिक सरासरी पगार 19 लाख ते 75 लाखांपर्यंत असू शकतो.