Chennai: चेन्नईतील एका साध्या मेडिकल दुकानात 15 हजार रुपये मासिक पगारावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने शनिवारी सकाळी (7 ऑक्टोबर) आपल्या मित्राला 2 हजार रुपये ट्रान्सफर (Money Transfer) केले. त्यानंतर त्याच्या खात्यात अचानक 753 कोटी रुपये (Money) जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच्या खात्यात जमा झालेला कोट्यवधींचा पैसा पाहून तोही चक्रावून गेला. नेमकं झालं काय? जाणून घेऊया…


नेमकं घडलं काय?


चेन्नईच्या करणकोविल येथे राहणारा मुहम्मद इद्रिस हा तरुण तेनामापेठ येथील एका मेडिकल दुकानात काम करतो. त्याने 7 ऑक्टोबर रोजी त्याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून आपल्या मित्राला 2 हजार रुपये पाठवले होते. त्यानंतर आलेला बँक बॅलन्सचा एसएमएस पाहून इद्रिस चक्रावून गेला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, मेसेजमधून त्याला कळलं की, त्यांचा बँक बॅलन्स 753 कोटींवर पोहोचला आहे. त्याच्या फोनवर आलेला एसएमएस पाहून त्याला आश्चर्य वाटलं. तो चक्क करोडपती झाला होता.


बँकेनं अकाऊंट केलं सीज


आता या सगळ्या प्रकारानंतर इद्रिसने याची माहिती लगेच बँकेला दिली आणि बँकेकडून त्याचं अकाउंट सीज करण्यात आलं, म्हणजेच बँकेकडून त्याचं खातं गोठवण्यात आलं. बँकेनं यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, तांत्रिक खराबीमुळे त्याच्या खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाली होती.


मेसेजिंगमधील त्रुटीमुळे असा प्रकार?


इद्रिसने म्हटलं की, याबाबत बँक शाखा अधिकाऱ्यांनी योग्य स्पष्टीकरण दिलेलं नाही. दरम्यान दुसरीकडे कोटक महिंद्रा बँकेच्या प्रवक्त्याने सांगितलं की, एसएमएस मेसेजिंगमधील त्रुटीमुळे ही घटना घडली. इद्रिस यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएस दिसत आहे. पण खरंतर, त्याच्या खात्यात प्रत्यक्षात कुठलीही रक्कम जमा झालीच नाही. तसंच टीम यावर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.


यापूर्वीही घडले असे प्रकार


तामिळनाडू शहरातील ही काही पहिली घटना नाही, तर याआधीही असे प्रकार घडले आहेत. तामिळनाडू शहरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी चेन्नईतील एक कॅब चालक राजकुमार यांनाही असाच धक्का बसला होता. कॅब ड्रायव्हरला त्याच्या तामिळनाडू मर्केंटाईल बँक (TMB) खात्यात 9 हजार कोटी जमा झाल्याचा मेसेज अकाऊंट बॅलन्स चेक करताना आला होता. त्यानंतर टीएमबी बँकेने तत्काळ कारवाई करत त्यांच्याकडून पैसे परत घेतले होते.


हेही वाचा:


VIDEO: जुगाड असावा तर असा! पठ्ठ्याने खाटेपासून बनवली चारचाकी गाडी; व्हिडीओ पाहून लोक चकित