China History : नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) येणं ही सामान्य बाब आहे. पण, कधीकधी या आपत्तीला मानवही जबाबदार असतो. चीनमध्ये ही असंच काहीसं घडलं होतं. चीनमध्ये एकेकाळी भीषण दुष्काळ पडला होता आणि या संकटाला सर्वस्वी माणूस जबाबदार होता. तानाशाहच्या एका आदेशामुळे संपूर्ण देशावर मोठं संकट ओढवलं, ज्यामुळे सुमारे सव्वा तीन कोटी लोकांचा मृत्यू झाला. चीनमध्ये 1958 ते 1962 हा काळ 'ग्रेट लीप फॉरवर्ड' (Great Leap Forward) म्हणून ओळखला जातो. याचाच दुसरा अर्थ म्हणजे 'नरकाचा काळ'. या काळात चीनमध्ये भीषण दुष्काळ पडला होता, ज्यामुळे कोट्यवधी लोकांना प्राण गमवावे लागले. पण हे संकट पूर्णपणे नैसर्गिक नसून यामागे मनुष्याचा हात होता. हा मनुष्य म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे नेते माओ त्से तुंग (Mao Zedong). यांच्या एका निर्दयी आदेशाचा परिणाम जनतेवर झाला आणि कोट्यवधी लोक मारले गेले.


चिमण्यांना मारण्याचा विचित्र आदेश


पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे नेते माओ त्से तुंग यांनी देशातील सर्व चिमण्यांना मारण्याचा आदेश जारी केला. चिमण्यांना उपद्रवी पक्षी घोषित करत त्यांनी चीनमधील सर्व चिमण्यांची कत्तल केली. चिमण्या धान्याची नासाडी करतात आणि खूप धान्य खातात, असा त्यांचा समज होता. त्यामुळे चिमण्यांना मारल्यास जनतेला अधिक धान्य मिळेल, असं त्यांचं मत होतं. इतकंच नाही तर, प्राणी आणि पक्षी हे देशाच्या विकासामध्ये अडचण निर्माण करतात. ते नसतील तर, देश लवकर विकास करेल. जनावरं खात असलेलं धान्यही जनतेच्या कामी येईल, या विचाराने त्यांनी देशातील चिमण्याच नाही तर, उंदीर, माश्या, मच्छर यांचाही समूळ नायनाट करण्याचा आदेश दिला. पण माओ त्से तुंग यांच्या चुकीची मोठी किंमत जनतेला चुकवावी लागली.


चिमण्या मारण्यामागचं कारण काय?


या यादीत चिमणीचा समावेश करण्यात करण्याचं कारण म्हणजे चिमण्या भरपूर धान्य खात असे. धान्य हे फक्त माणसांसाठी असले पाहिजे, चिमण्यांसाठी नाही, असं माओचं मत होतं. लवकरच देशातील चिमण्यांना संपवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. पण चिमण्यांना संपवण्याची मोठी किंमत चीनने चुकवली. लोकांनी चिमण्या मारायला सुरुवात केली. लोकांनी चिमण्यांना गोळ्या घालून ठार मारायला सुरुवात केली, त्यांची घरटी तोडली आणि त्यांची अंडी फोडली. 


'ही' चूक पडली महागात


यामुळे दोन वर्षांत चीनमधील चिमण्यांची संख्या खूप कमी झाली. चिनी पत्रकार डाय किंग यांच्यानुसार, माओ यांना प्राण्यांबद्दल काहीच माहिती नव्हती आणि त्यांनी तज्ज्ञांची मदत घेतली नाही किंवा सल्हीला समजून घेण्यासाठी ते तयार नव्हते. 


कीटकांकडून पिकांची नासाडी


ज्या धान्यासाठी चिमण्यांची कत्तल करण्यात आली तेच धान्य नंतर धोक्यात आलं. धान्यावर किड आणि किटकांनी हल्ला केला. देशात चुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे लोकांनाही कळलं. चिमण्या कीटक आणि टोळ खात असत. पण, चिमण्यांची संख्या कमी झाल्यामुळे कीटक आणि टोळांचा उपद्रव वाढू लागला आणि पिकांची नासाडी होऊ लागली. यामुळे भयंकर दुष्काळ पडला आणि लाखो लोक मरण पावले.


ही चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. परिणामी सुमारे सव्वा तीन कोटी लोकांना या काळात जीव गमवावा लागला. यानंतर चीनमध्ये नैसर्गिक संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चिमण्या आणि इतर प्राणी आयात करावे लागले.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


India Richest Cricketer : तेंडुलकर, कोहली किंवा धोनी नाही, 'ही' व्यक्ती भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू