Trending News : हिंदू संस्कृतीमध्ये मुलींना परकं धन समजलं जातं, कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण आईवडीलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आईवडीलांची सेवा करताना दिसतात. मुलींना नाजूक परिस्थितीची गंभीरतेचीही चांगली ओळख असते. हे त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येतं. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चिमुकलीनं असं काही केलं की जणू हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ह्रदयाला हात घातला आहे. आम्ही असं का म्हणतोय याची प्रचिती तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच येईल. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली बाजारात कडक उन्हात बसलेल्या तिच्या आईला उन्हापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिचं हे वागणं तिच्या आईसाठीच्या प्रेमाची व्याख्या सांगत आहे.
एक महिला घरचा खर्च भागवण्यासाठी रस्त्याच्या कडेला कडक उन्हात बसून आंबे विकताना दिसत आहे. यावेळी तिची मुलगी उन्हात बसलेल्या आपल्या आईचा त्रास कमी करण्यासाठी आईच्या डोक्यावर पुठ्ठ्याचा वापर करत सावली करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय ही चिमुकली कडक उन्हात आईला पुठ्ठ्यानं हवा घालताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
संबंधित इतर बातम्या