Gilgit Baltistan Girl ViraL Video: बॉलिवूड संगीताची भूरळ आता केवळ देशातच नव्हे तर जगभराला पडल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी मुलीचा 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील डान्स व्हायरल झाल्यानंतर आता बाल्टिस्तानमधील एका मुलीचा 'इन आंखों की मस्ती के' हे रेखाचं गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गिलगिट हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग असून त्या ठिकाणची एक कुरळ्या केसांची मुलगी हे गीत गाताना दिसत आहे. 


सोशल मीडियावर आजकाल लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये बिनकामाच्या व्हिडीओंचा भरणाच असतो, पण काही व्हिडीओ हे खरोखरच दखल घेण्यासारखे असतात. गिलगिटच्या बर्फाळ पर्वतीय भागात राहणारी ही कुरळ्या केसांची मुलगी 'उमराव जान' या रेखाच्या चित्रपटातील 'इन आंखों की मस्ती के' हे गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 
 
गिलगिट-बाल्टिस्तान(Gilgit-Baltistan) मधील एक मुलगी आशा भोसले(Aasha Bhosale) यांचं लोकप्रिय गाणं ' इन आंखों की मस्ती '(In Ankhon Ki Masti) गातांना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावरुन संगीतप्रेमी लोक या व्हिडीओला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. जर तुम्हीपण संगीतप्रेमी असाल आणि आशा भोसलेंच्या गाण्याचे फॅन असाल तर तुम्हाला हा  व्हिडीओ पहायला नक्की आवडेल. गिलगिट-बाल्टिस्तान मधील या मुलीच्या मधुर आवाजाने कान मंत्रमुग्ध होत असल्याचं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. 


In Ankhon Ki Masti Viral Song: सोशल मीडियावर याच व्हिडीओची चर्चा


गिलगिट-बाल्टिस्तानमधील मुलीने गायलेल्या 'इन आंखों की मस्ती 'या गाण्याचा व्हिडीओ 'ऑल गिलगिट' नावाच्या या  इंस्टाग्राम पेजवर पोस्ट झाला आहे. केवळ काही सेकंदाच्या या  व्हिडीओमध्ये कुरळ्या केसांतली एक तरुणी 1981 सालच्या उमराव जान (Umrao Jaan) या चित्रपटातील आशा भोसलेंचं हे गाणं गात आहे. त्या मुलीचा आवाज सतत ऐकावासा वाटणारा आहे.


"शुद्ध स्वर वाली पहाड़ों की एक लड़की' असं या  व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे. तसेच हा या व्हिडीओचा हा पहिला भाग असून याचे पुढील भागही या पेजवर उपलब्ध आहे. हा व्हिडीओ 19 लाखांपेक्षा जास्त लोकांनी सोशल मीडियावर बघितला आहे. त्यावर 2.7 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी  व्हिडीओवर कॉमेंटकरुन तिचे कौतुक केलं आहे.






Umrao Jaan Song: ऐंशीच्या दशकातलं लोकप्रिय गीत 


ऐंशीच्या दशकात 'उमराव जान' या चित्रपटातील रेखाच्या या गीतानं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय असल्याचं दिसून येतंय. उर्दू भाषेतील बोल असलेलं हे गाणं आशा भोसले यांनी गायलं असून मोहम्मद जहूर खय्याम यांनी त्याला संगीत दिलं आहे.