Trending Sanskrit Video : संस्कृत (Sansrit) ही जगातील सर्वात जुनी भाषा आणि सर्व भारतीय भाषांची जननी देखील मानली जाते. याशिवाय संस्कृतला 'देववाणी' असेही म्हणतात. याच भाषेशी संबंधित एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेट हा अनेक लोकांचा आवडीचा खेळ, क्रिकेट सामन्याच्या मागे केली जाणारी कॉमेंट्री हा खेळ पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढवते. तुम्ही अनेकदा हिंदी-इंग्रजीमध्ये क्रिकेट कॉमेंट्री ऐकली असेल, पण तुम्ही कधी संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्री पाहिली आहे का? नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच
चक्क संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्रीचा व्हिडीओ
हिंदू धर्मातील जवळपास सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. आजही हिंदू धर्मात यज्ञ आणि उपासना संस्कृत मंत्रांद्वारेच केली जातात. ही भाषा किती प्राचीन आहे, हे माहीत नाही, पण संस्कृत भाषा पाच हजार वर्षांपासून चालत आल्याचे आधुनिक अभ्यासकांचे मत आहे. अनेक शाळांमध्ये संस्कृत शिकवली जाते, परंतु बहुतेकांना ही भाषा समजत नाही. पण आता याच भाषेत चक्क क्रिकेट कॉमेंट्रीचा व्हिडीओ समोर आला आहे. जो चांगलाच व्हायरल होतोय.
काय आहे व्हायरल व्हिडीओ मध्ये?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अस्खलित संस्कृत बोलताना दिसत आहे. तुम्ही क्रिकेटच्या सामन्यांवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये भरपूर कॉमेंट्री पाहिली आणि ऐकली असतील, पण तुम्ही क्रिकेट सामन्यांची संस्कृतमध्ये कॉमेंट्री कधी ऐकली आहे का? तर मग या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुले रस्त्यावर क्रिकेट खेळत आहेत, तर काही लोक त्यांचा सामना पाहत आहेत. त्याचवेळी एक व्यक्ती कॅमेऱ्याने सामना रेकॉर्ड करत आहे आणि संस्कृतमध्ये कॉमेंट्रीही करत आहे. लोक सामान्यपणे अस्खलितपणे हिंदी बोलू शकत नसले तरी ही व्यक्ती अस्खलित संस्कृत बोलताना दिसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटू शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Trending Video : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण गाईला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा हा व्हायरल व्हिडीओ
- Viral Video : स्ट्रीट फूड आवडीनं खाताय? पाहा 'हा' धक्कादायक व्हिडीओ, मिठाईवाला चक्क झाऱ्यानं खाजवतोय पाठ!