Trending Video : सध्या सौदी अरेबियामध्ये (Saudi Arebia) एक विचित्र आणि अत्याधुनिक व्हिडीओ (Viral Video) पाहायला मिळत आहे. ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. फूड डिलीव्हरी करण्यासाठी चक्क हवेत उडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खरा आहे की एडिट केलेला हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतोय, नेमकं सत्य काय?


फ्लाईंगद्वारे फूड डिलिव्हरी


या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक डिलिव्हरी एजंट फ्लाईंगद्वारे फूड डिलिव्हरी करताना दिसेल. व्हायरल होत असलेल्या या आश्चर्यकारक व्हिडिओमध्ये डिलिव्हरी एजंट अन्न पोहोचवण्यासाठी हवेत उडताना दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सौदी अरेबियातील एक डिलिव्हरी एजंट जेवण देण्यासाठी जेटपॅकवर उड्डाण करत आहे. हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खरा आहे की एडिट केलेला हा प्रश्न आहे. सोशल मीडिया युझर्सनी जेटपॅकमधील एका व्यक्तीची सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणावर डिलीव्हरी होत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 


 






काय आहे या व्हिडीओमध्ये?


या व्हिडीओमध्ये, एक माणूस इंजिन किंवा जेटपॅक वापरून उड्डाण करत आहे आणि एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत फूड डिलीव्हरी करत आहे. काहींच्या मते हा व्हिडिओ खरा आहे, हा फूड डिलिव्हरी व्यवसायाचा एक अतिशय हुशार आणि अनोखा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ड्रोनचा वापर करून त्यांच्या ऑर्डर वितरित केल्या जातात. किराणा सामान आणि अन्न यांसारख्या वस्तू वितरीत करण्यासाठी जेटपॅक वापरून काही श्रीमंत देशांमध्ये ड्रोन-आधारित डिलिव्हरी करत आहेत.


अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नेटकरी आश्चर्यचकित


आतापर्यंत तुम्ही फूड डिलिव्हरी ड्रोन, रेस्टॉरंट फूड रोबोट्स इत्यादी गोष्टी पाहिल्यानंतर, आता एअर डिलिव्हरी सारख्या शोधांमुळे भविष्यात खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याचा अनुभव अधिक सोपा आणि सोयीस्कर होणार यात शंका नाही. मात्र हवेत उड्डाण करून अशा नवीन तंत्रज्ञानाने सोशल मीडीयावरील युझर्सना आश्चर्यचकित केले आहे.


महत्वाच्या बातम्या :