Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज जगाच्या कानाकोपऱ्यातील भन्नाट व्हिडीओ शेअर होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात आणि व्हायरल होतात. कधी स्टंट, कधी मजेदार व्हिडीओ तर कधी काही घटनांचे व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. हा व्हिडीओ आहे एका हत्तीचा (Elephant Viral Video) आता तुम्ही म्हणालं, या हत्तीच्या व्हिडीओमध्ये काय खास आहे. हे तर तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल.


हत्तीने हात दाखवून बस थांबवली


या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती माणसाप्रमाणे हात दाखवून बस थांबवताना दिसत आहे. माणूस ज्याप्रमाणे हात दाखवून बस थांबवतो. त्याप्रमाणे हा हत्ती सोंड दाखवून बस थांबवत आहे. इतकंच नाही तर हा हत्ती बस थांबल्यानंतर त्या बसमध्ये चढण्याचाही प्रयत्न करताना दिसतोय. या वेळी काही प्रवासी घाबरले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. नेटकऱ्यांचं या व्हिडीओमुळे चांगलं मनोरंजन होत आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण खदखदून हसत आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ






बस थांबवत हत्तीचा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरू एक छोटी टाटा बस जात आहे. या बसमध्ये प्रवासी आहेत. यावेळी बससमोर एक हत्ती येतो आणि तो बसला हात म्हणजे सोंड दाखवतो. बससमोर हत्ती आल्याने ड्रायव्हर बस थांबवतो. पण हत्ती एवढ्यावरच थांबत नाही. तर हत्ती बसच्या दरवाजातून आत चढण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसेल. व्हिडीओ पाहून तुम्हाला जाणवेल की, बहुतेक हत्तीलाही बसने प्रवास करायचा होता.


व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज


हत्तीचा हा व्हिडीओ एका ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा (Dipanshu Kabra) यांनी हत्तीचा हा मजेदार व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलं आहे की, 'दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी सर्वांनाच लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे.' या व्हिडीओला अनेकांना रिट्विट केलं आहे. अवघ्या काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 70 हजारहून अनेक जणांनी पाहिला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.