Elephant Viral Video : भारतात वेगवेगळे स्ट्रीट फूड (Street Food) प्रसिद्ध आहेत. स्ट्रीट फूड म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यातच पाणीपुरी (Panipuri) म्हणजे जणु अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आंबट, गोड, तिखट अशा पाणीपुरीची चव तोंडात रेंगाळत राहते. पाणीपुरीची चव आठवताच तोंडाला पाणी सुटतं. या पाणीपुरीचं वेड माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लागलं आहे. एका हत्तीला पाणीपुरीची आवड निर्माण झाली आहे. या हत्तीचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हत्तीला लागली पाणीपुरीची चटक
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हत्ती पाणीपुरी खाताना दिसेल. हा व्हायरल आसाममधील आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती आवडीने पाणीपुरी खाताना दिसत आहे. हत्तीला पाणीपुरी खाताना पाहून आजूबाजूला उपस्थित लोकही अवाक् झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हत्ती एका स्टॉलजवळ एक हत्ती उभा राहून पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसेल. इतकंच नाही तर हा पाणीपुरी बनवणारा देखील आवडीनं हत्तीला पाणीपुरी बनवून देत आहे. हत्तीने पाणीपुरीवर चांगला ताव मारला आहे.
पाहा व्हिडीओ : हत्ती खातोय पाणीपुरी
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
स्ट्रीट फूड हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणीपुरीचं चव अनेकांना वेड लावते. अनेकांना पाणीपुरी खाण्याचा मोह आवरता येत नाही. माणसांप्रमाणेच आता हत्तीलाही पाणीपुरीची चटक लागली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे.
हत्ती पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक वेळा असे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचं चांगल मनोरंजन होतं.