Elephant Kicked Bike Like Football Video : सध्या जगभरात फिफा फुटबॉल विश्वचषकाची (FIFA World Cup) क्रेझ पाहायला मिळत आहे. फुटबॉल प्रेमींसाठी ही एक पर्वणी मानली जाते. फुटबॉल (Football) चाहते आपल्या लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात. दरम्यान, फुटबॉल आणि चाहत्यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. असा काहीसा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये 'रोनाल्डो' हत्तीचा गोल नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका हत्तीने फुटबॉल खेळातील गोलप्रमाणे चक्क दुचाकीला जोरदार किक मारल्याचा हा व्हिडीओ आहे. 


व्हायरल व्हिडिओमधील हत्तीवर फिफा फिवर चढला आहे. असं म्हणावे लागेल. रस्त्यात दुचाकी दिसताच, हत्तीला फुटबॉलप्रमाणे दुचाकीला किक करण्याचा मोह आवरता आला नाही. सुदैवाने दुचाकी स्वाराने तत्परता दाखत तेथून पळ काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला नाहीतर, दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. नागरिकांनी जंगली प्राण्यांसमोर जाताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.


हत्तीने फुटबॉलसारखी उडविली दुचाकी


भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप पाहायला जाणं एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. हत्तीच्या मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून पायाखाली तुडविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात दुचाकीचं नुकसान झालं आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर घडली आहे. दरम्यान, तरुणांनी वेळीच सावध होत तेथून पळ काढल्यामुळे तरुणांचा जीव वाचला अन्यथा त्यांना दुखापत झाली असती.


पाहा व्हिडीओ : हत्तीने फुटबॉलसारखी उडविली दुचाकी, व्हिडिओ चर्चेत



थोडक्यात बचावले तरुण


चप्राड येथील सुरेश दीघोरे आपल्या मित्रासोबत हत्ती पाहायला दुचाकीवरून गेले होते. दरम्यान, अचानक हत्तींचा कळप जवळ येत असल्याचे पाहताच दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली. मात्र, त्याचवेळी कळपातील एका हत्तीने आपल्या मार्गात उभी असलेली दुचाकी पाहिली. या हत्तीने दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखं उडवून दिलं. उपस्थित तरुणांनी या घटनेचा चित्रीत केलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणांमध्ये व्हायरल होत असतात. अनेक वेळा काही भन्नाट आणि मनोरंजक व्हिडिओ समोर येतात तर, काही वेळेस धक्कादायक वास्तव दाखवणारे व्हिडीओही व्हायरल होतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pune Truck Accident : ब्रेकफेल झालेल्या ट्रकचा चालकाविना प्रवास, मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर ट्रकचा थरार