Fifa World Cup 2022 Viral News : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धा  (Fifa WC) जगभरातील फुटबॉल फॅन्स पाहत आहेत. ज्या देशांनी यात सहभाग घेतला आहे, त्या देशाचे फॅन्स तर स्पर्धा पाहत आहेतच पण याशिवाय आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी भारतासारखे देशही आवर्जून सामने पाहत आहेत. पण या सर्वात पोलंडमधील एका व्यक्तीने सर्व सीमा पार करत चक्क शस्त्रक्रिया सुरु असतानाही पोलंड संघाचा सामना पाहिल आहे. पोलंडमधील एका व्यक्तीने स्पाइनल ऍनेस्थेसियाचे ऑपरेशन सुरु असताना वर्ल्ड कपचा सामना पाहिला असून किल्समधील एसपी झॉझेड एमएसडब्ल्यूआयए या रुग्णालयाने संबधित व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. तर भारतीय उद्योजक आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधकृत ट्वीटरवरुन हा फोटो शेअर करत फिफाकडे या व्यक्तीला एखादा खास पुरस्कार द्या अशी मजेशीर मागणी केली आहे. दरम्यान पोलंड संघाचा विचार करता बाद फेरीच्या सामन्यात फ्रान्स संघाकडून 3-1 च्या फरकाने पराभूत झाल्यानंतर त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. 

आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने

एकूण 32 संघानी फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेत स्पर्धा सुरु झाली. ज्यानंतर ग्रुप स्टेजचे मग बाद फेरीचे सामने पार पडले आणि 32 पैकी 8 संघच स्पर्धेत पुढे पोहोचले आहेत. यामध्ये ब्राझील, क्रोएशिया, पोर्तुगाल, मोरोक्को, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इंग्लंड आणि फ्रान्स या 8 संघाचा समावेश असून कोणता संघ कोणाशी, कधी भिडणार हे पाहूया...

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचं वेळापत्रक:

सामना संघ तारीख वेळ ठिकाण
उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना ब्राझील विरुद्ध क्रोएशिया 09 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता एज्युकेशन सिटी स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को 10 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता अल-थुमामा स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स 11 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता लुसेल स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना इंग्लंड विरुद्ध फ्रान्स  12 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता अल बायत स्टेडियम

हे देखील वाचा-