Trending News : जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे एकापेक्षा अधिक लग्न करणं कायदेशीर आहे. यासाठी काही अटी लागू आहेत. इजिप्तमध्येही असा एक मसुदा तयार करण्यात आली आहे, ज्यानुसार पुरुषांनं एकापेक्षी अधिक लग्न करण्याची मुभा मिळते. मात्र, यासाठी एक अट आहे. ती अट म्हणजे त्या पुरुषाला दुसरं लग्न करण्याआधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. तसेच न्यायालयासह पुरुषाला त्याच्या पहिल्या पत्नीचीला दुसऱ्या लग्नाची माहिती द्यावी लागेल. यानंतर पुरुषाला दुसरं लग्न करता येईल.


नुकतंच मिस्त्रमधील वृत्तपत्र अल-अहराममध्ये (Al-Ahram) एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार, हाउस ऑफ रिप्रेसेंटीव्ह नसावा अल-दिबने 'नवीन मसुदा- वैयक्तिक स्थिती कायदा' सादर केला आहे. या विधेयकांतर्गत या नव्या अटी लागू करण्यात आल्या आहेत. कलम 14 अन्वये अशी तरतूद आहे की, जर पतीला बहुपत्निक (एकाहून अधिक विवाह करणे) व्हायचे असेल तर त्याला कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे याबाबत विनंती करावी लागेल. यासोबतच तुमच्या पत्नीलाही दुसऱ्या लग्नाबाबत माहिती द्यावी लागेल. तसेच, पहिल्या पत्नीला बहुपत्नीत्वाच्या परवानगीसाठी न्यायालयात आपली संमती किंवा असहमती द्यावी लागेल.


या कायदेशीर मसुद्यातील कलम 16 नुसार की, पुरुषाच्या पहिल्या पत्नीला न्यायालयात तिच्या पतीच्या बहुपत्निक होण्याबाबत तिची सहमती किंवा असहमती विचारण्यात येईल. त्यानंतरच पतीला एकाहून अधिक लग्नाची परवानगी देण्यात येईल. जर न्यायालयाच पहिल्या पत्नीने यासाठी असहमती दर्शवली आणि तरीही पती बहुपत्निक होण्यासाठी आग्रह करत असेल तर, या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न न्यायालय करेल. तसेच जर पती-पत्नी न्यायालयात आपल्या मतावर ठाम राहिल्यास आणि पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला तर तिला आर्थिक अधिकारांतर्गत न्यायालयाकडून मदत मिळेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha