Ulhasnagar :  'एक फुल दो माली' अशीच काहीशी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. एका तरुणीच्या दोन प्रियकरांमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसी नक्की कुणाची यावरून हा वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. याचा व्हिडीओ व्हायरल सध्या सोशल मीडियावर झाला आहे. प्रेयसी कुणाची यावरून दोन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचा हा व्हिडीओ आहे. गर्लफ्रेड कुणाची यावरुन झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर चक्क दोन गटातील हाणामारीपर्यंत पोहचलं. उल्हासनगर शहरात भररस्त्यात घडलेला हा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Continues below advertisement


याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भानू कोरी या तरुणाचं एका तरुणीशी प्रेम संबंध होते. मात्र काही दिवसांपासून तरुणी त्याला शाकीब खान या तरुणाच्या प्रेमात पडली होती. 


भानूला याचा राग आल्याने त्याने शाकीबला फोन करून उल्हासनगरच्या नेताजी चौकात बोलवले. मात्र भानूसोबत त्याचे मित्रही होते. याची कुणकुण शाकीबला लागली होती. म्हणून शाकिब देखील आपल्या तीन मित्रांसोबत तिथे आला. यावेळी प्रेयसी कोणाची यावरून दोन्ही गट एकमेकांसमोर येताच तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha