Viral Video : लग्न समारंभात फटाके वाजवणं ही सामान्य गोष्ट आहे. लग्नाचा आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके वाजवले जातात. भारताप्रमाणे विदेशातही लग्नामध्ये फटाके वाजवले जातात. असाच मस्ती आणि आनंद व्यक्त करण्याच्या प्रयत्न लग्नातील पाहुण्यांच्या जिव्हारी बेतला असता. आम्ही असं का म्हणतोय याचा अंदाज तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच येईल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.


एका तळीरामामुळे लग्नाचा उत्साह विरळून गेल्याचं एका व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. परदेशातील लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक दारु प्यायलेल्या पाहुण्यामुळे लग्नात आग लागल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हा तळीराम इतक्या बेधुंद अवस्थेत होता की, आग लागल्यानंतरही हा व्यक्ती हाताने आग विझवण्याचा प्रयत्न करत होता.







नक्की काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरु असल्याचं दिसत आहे. समारंभात मागे गाणं सुरु आहे. काही पाहुणे डान्स करत आहेत, तर काही फटाके वाजवून आनंद व्यक्त करत आहेत. यावेळी एका पाहुण्याचे खूप दारू प्यायलेला दिसत आहे. या व्यक्तीने फुलबाजा पेटवून नाचताना दिसत आहे. यावेळी फुलबाजामुळे पाहता-पाहता बाजूला असलेल्या सजावटीच्या सामानाने पेट घेतला. 


फुलबाजामुळे आग अचानक वाढली. पण या तळीरामाला याबाबत शुद्धचं नव्हती. आग लागल्याचं पाहून बाजूला असलेल्या पाहुण्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात झाली. त्यानंतर तळीरामाचं आगीकडे लक्ष जातं. त्यानंतर चक्क हा तळीरामाने हातानेच आग विझवण्याचा प्रयत्न करतो.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ Thomas नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानं कॅप्शन देत म्हटलं आहे की, 'मला माझ्या लग्नात इतकं नशेत राहायचं आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या