Artificial Intelligence Faces: प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती असते, त्या संस्कृतीची झलक पारंपरिक स्त्रीत्वाच्या संकल्पनांमध्ये सुद्धा दिसते. भारतीय स्त्रीचं रुप राज्यानुसार कसं बदलतं त्याचा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला गेलाय... आणि ह्या प्रयोगाची सध्या प्रचंड चर्चा होतेय...पण त्याचबरोबर यामध्ये दाखवलेल्या स्त्रीयांच्या रुपावरुन काही आक्षेप सुद्धा घेतले जात आहेत...नेमका हा चर्चीत प्रयोग आहे तरी काय, तो साकारलाय कसा तसच त्यावरुन निर्माण झालेला वाद काय आहे. (Delhi Artist Created Stereotypical AI Photos:) 






एखादं राज्य म्हटलं की त्या राज्याच्या संस्कृतीप्रमाणे तिथल्या महिलांचा चेहरा समोर येतोय. आणि हेच व्हिज्युअलाइज करत गुडगावच्या माधव कोहलींनी प्रत्येक राज्याच्या महिलेचं रुप काय असू शकतं? हे आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून दाखवलंय...दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, अरुणाचल, गुजरात, कश्मिर, केरळ, पंजाब, राजस्थान, उत्तराखंडसह प्रत्येक राज्यातील तिथल्या महिलांचा चेहरा आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून दाखवलंय...मात्र उत्तर प्रदेशसंदर्भातल्या एका फोटोवरुन वाद निर्माण झाला. आधी हा फोटो एका वयोवृद्ध स्त्रीचा तयार झाला...त्यानंतर कलाकाराने हा फोटो बदलून त्याठिकाणी एका सुंदर स्त्रीचा फोटो साकारला. 



खरंतर भारतीय स्त्री या संकल्पनेला कुठल्याही स्टिरिओटाईप्समध्ये अडकवणं हे चुकीचं आहे अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात.  स्टिरिओटाईप्स...म्हणजे रुढीबद्ध किंवा साचेबद्ध विचार...अनेकदा असा विचार चुकीच्या गोष्टींचा प्रचार करु शकतो..त्यामुळे अशा स्टिरिओटाईप्समधून एखाद्या राज्यातल्या स्त्री सौंदर्याकडे पाहणं हे चूक असल्याच्या प्रतिक्रिया सोशल माध्यमातून उमटतायत. भारताच्या प्रत्येक भागातल्या चेहऱ्याची ठेवण, त्यातला आखीव रेखीवपणा हा त्या त्या प्रांतानुसार बदलतो..त्यामुळे या रुढीबद्ध संकल्पनांचं हे मूर्त रुपच फक्त कंप्युटरनं आपल्यासमोर ठेवलं एवढंच आपण म्हणू शकतो..


माधव कोहलीनं पोस्ट केलेले काही फोटो पाहा: