Cow Viral Video : पावसाळा सुरु झाला आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सखोल भागात पाणी साचलेलं दिसतं. अशाच पाण्यात कधी कधी विजेच्या तारा पडतात. यामुळे विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. सध्या सोशल मीडियावर गायीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या पाण्यात उभ्या असलेल्या गायीला विजेचा धक्का लागतो, मात्र तेथील दुकानदार त्याच्या तल्लख बुद्धीने गायीचे प्राण वाचवतो.


हा व्हायरल झालेला व्हिडीओ पंजाबमधील आहे. या व्हिडीओमधून मानवतेचा संदेश मिळत आहे. मासना जिल्ह्यात पाण्यात उभ्या असलेल्या गायीला विजेचा धक्का लागला, यानंतर गाय कळवळत उभी होती. यावेळी दुकानदाराने गायीचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.






काय आहे घटना?
पंजाबमधील मासना जिल्ह्यात रस्ता जलमय झाल्याचं व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी भरलेलं दिसत आहे. रस्त्यावर एक गाय फिरताना दिसते. यावेळी अचानक गायीला विजेचा धक्का लागला आणि गाय झटपटू लागली. व्हायरल व्हिडीओमध्ये गाय झटपटताना दिसत आहे.


विजेचा धक्का लागल्यानंतर काही वेळ गायीला वाचवण्यासाठी कोणीही येत नाही. काही वेळानंतर एका दुकानदार बुद्धीनं गायीचा जीव वाचवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


दुकानदाराने वाचवले गायीचे प्राण
गाय पाण्यात जिथे उभी होती त्या ठिकाणी विजेचा खांब होता आणि त्या खांबाला जोडलेली विजेची तार पाण्यात पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. यावेळी गायीच्या शेजारी असलेल्या दुकानदाराने मानवतेचा आदर्श दाखवला


दुकानदार लगेच कापडाच्या साहाय्याने गाय वाचवतो. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकवेळा असे व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये माणसांनी मुक्या प्राण्यांचा जीव वाचवल आहे.


संबंधित इतर बातम्या