मुंबई : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक कपल बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक जोडपे अतिशय वेगाने बाइक चालवत असताना रस्त्यावरच रोमान्स करताना दिसत आहे. हे हायवेवर बाईकवरील अश्लील चाळे कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या अशा बेजबाबदार वर्तनामुळे कपलसोबतच इतर वाहनचालक दोघांचीही सुरक्षा धोक्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.


हायवेवर बाईकवरच कपलचा रोमान्स


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक जोडपं बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. महिला पेट्रोलच्या टाकीवर बसलेली दिसत आहे आणि गाडी चालवणारी व्यक्ती महामार्गावर वेगाने बाईक चालवत असून टाकीवर बसलेल्या महिलेने व्यक्तीला मिठी मारल्याचं दिसत आहे. हायवेवर बाईक फूल स्पीडमध्ये असताना सुरु असलेला हा कपल रोमान्स सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी कोटा आरटीओकडून बाईकचा नोंदणी क्रमांक शोधून काढला आहे. ही घटना कोटीमधील बुंदी रोड हर्बल गार्डनजवळ घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


दुचाकी चालवत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल


दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक या जोडप्याच्या बेजबाबदार आणि असभ्य वर्तनावर टीका करत आहेत. या संदर्भात कोटा पोलिसांनी माहिती देताना सांगितलं आहे की, कोटा शहर पोलीस स्टेशनच्या टीमने चालत्या मोटारसायकलवरून अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुण आणि महिलेला अटक केली आहे. कोटा शहर पोलीस तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत.


पाहा व्हायरल व्हिडीओ :






दुसऱ्या ट्वीटमध्ये पोलिसांनी लिहिलं आहे की, पोलिसांनी या जोडप्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून कलम 294A आयपीसी अंतर्गत प्रकरणात, एफआयआर क्र. 122/24 गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी मोटारसायकलसह आरोपी मोहम्मद वसीम आणि तरुणीवर कायदेशीर कारवाई केली आहे. पोलिसांनी पुढे सांगितलं की, हे जोडपे कोटा येथील एका खासगी कंपनीत काम करतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणचे रहिवासी आहेत. व्हायरल व्हिडीओचे लोकेशन कोटा-बुंदी नेशन हायवेवर नांता पोलिस स्टेशन हद्दीतील आढळले आहे. पोलिसांनी मोटरसायकलच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे जोडप्याचा शोध घेतला आणि ही कारवाई केली आहे.