मुंबई : सोशल मीडियामुळे जगभरातील अनेक विचित्र कहाण्या समोर येतात. काही कहाण्या ऐकल्यावर सर्वसामान्यांना धक्का बसतो. सोशल मीडियावरही अनेक वेळा अशा विविध गोष्टी ऐकायला मिळतात. काही लोकांना तर यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळते. जगभरात काही चांगले तर काही विचित्र विक्रम करणाऱ्यांच्या नावे विश्वविक्रमाचीही नोंद केली जाते. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्यक्ती आणी त्याच्या नावावर नोंद असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत. 


32 वर्षात 105 लग्न


एका व्यक्तीने 105 महिलांसोबत लग्न केलं. यामुळे या व्यक्तीचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जिओव्हानी विग्लिओटोच्या नावावर जगात सर्वाधिक विवाह करण्याचा विक्रम आहे. त्याने घटस्फोट न घेता 1949 ते 1981 या काळात 105 महिलांसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या पत्नी एकमेकांना ओळखत नव्हत्या. आणखी एक विशेष बाब म्हणजे, विग्लिओटोने फक्त अमेरिकन महिलाच नाही तर, 14 देशांतील 27 राज्यांतील महिलांसोबत लग्न केलं.


'या' माणसानं रचला अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड


जिओव्हानी विग्लिओटोने 100 हून अधिक महिलांसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक केली. तो प्रत्येक वेळी लग्न करताना बनावट ओळखीचा वापर करायचा. तो प्रत्येक लग्नासाठी बनावट ओळखपत्र वापरत असे. लग्नानंतर जिओव्हानी पत्नीचे पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढत असे. मीडिया रिपोर्टनुसार, जिओव्हानी विग्लिओटोने लग्न केलेल्या महिलांपैकी फारच कमी महिलांना त्याच्याबद्दल पुरेशी माहिती होती. बहुतेक महिला त्याला नीट ओळखतही नव्हत्या.


नेमका कसा अडकला जिओव्हानी?


बनावट ओळख वापरुन वावरणाऱ्या जिओव्हानीला पकडणं सोपं नव्हतं. पण, त्याने शारोना क्लार्क या महिलेची फसवणूक केली. त्यानंतरशारोनाने जिओव्हानीला शोधण्याचा निर्धार केला. क्लार्कने स्वतः जिओव्हानीला शोधण्याचा निर्णय घेतला. क्लार्कच्या प्रयत्नांमुळे 28 डिसेंबर 1981 रोजी जिओव्हानी व्ग्लिओटोला अटक करण्यात आली.


पोलिसांनी दिलेली सर्व माहिती चुकीची


अटक झाली तेव्हा जिओव्हानी 53 वर्षांचा होता. जिओव्हानी हेही या व्यक्तीचं खरं नाव नसल्याचं सांगितलं जातं. पोलिस कोठडीत असतानाही त्यानं नाव बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या चौकशीत त्यानं आपलं नाव निकोलाई पेरुस्कोव्ह असल्याचं सांगितलं. तसेच तो इटलीमधील सिसिलीचा रहिवासी असून त्यांचा जन्म 3 एप्रिल 1929 रोजी झाल्याचं सांगितलं. पण त्याने पोलिसांनी दिलेलीही सर्व माहिती चुकीची होती. 


खरं नाव आणि ओळख काय?


याबाबतचा खरा खुलासा वकिलानं केला. वकिलानं सांगितलं की, त्याचं खरं नाव फ्रेड जिप असून त्याचा जन्म 3 एप्रिल 1936 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. न्यायालयाने व्ग्लिओटोला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि 336,000 डॉलरचा दंडही ठोठावला. 1991 मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झालं. त्याआधी आठ वर्षे तो अॅरिझोना राज्याच्या तुरुंगात कैद होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rent for Grave : ऐकावं तेस नवलंच! येथे मृतांनाही कबरीत राहण्यासाठी भाडं द्यावं लागतं, भाडं भरण्यास उशीर झाला तर मृतदेह कबरीतून बाहेर