Sunny Leone Photo On Hall Ticket : कर्नाटकात (Karnataka) एक अजब प्रकार समोर आला आहे. 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET-2022) एका परीक्षार्थीच्या हॉल तिकिटावर चक्क प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone) बोल्ड फोटो दिसला. आता या प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Post) होऊ लागला आहे. हा फोटो समोर येताच शिक्षण विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काय घडले नेमके?


परीक्षार्थीच्या हॉल तिकीटावर चक्क सनी लिओनी!
कर्नाटकातील रुद्रप्पा महाविद्यालयात हा प्रकार समोर आला असून याबाबत सध्या आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे, येथील एका परीक्षार्थीने चक्क सनी लिओनीचे छायाचित्र असलेले हॉल तिकीट दाखविल्यानंतर एकच गोंधळ उडाला, त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी या संदर्भात कडक कारवाई करत सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना छायाचित्र अपलोड करताना ही चूक झाली असावी. असे म्हणणे आहे. यावर परीक्षार्थीचे म्हणणे असे आहे की, त्याने परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरला नाही, उलट त्याने त्याच्या ओळखीच्या इतर लोकांना त्याच्यासाठी फॉर्म भरण्यास सांगितले होते.


शिक्षण विभागाने काय म्हटले? 
शिक्षण विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्वत: ऑनलाइन अर्ज करावे लागते, त्यासाठी 'यूजर आयडी आणि पासवर्ड' दिलेला आहे. जो केवळ त्याच्याकडेच असतो, इतर कोणीही त्यात छेडछाड करू शकत नाही. परीक्षेसाठी हॉल तिकीट तयार करण्यात शिक्षण विभागाची कोणतीही भूमिका नसते, कारण ही प्रक्रिया केवळ परीक्षार्थीकडूनच केली जाते, असे विभागाने म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवमोग्गाचे एसपी मिथुन कुमार जीके यांनी सांगितले की, परीक्षा केंद्राचे प्रभारी चन्नाप्पा यांनी सीईएन पोलिस ठाण्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांना कारवाई करण्याची विनंती, चौकशीचे आदेश
दुसरीकडे, सार्वजनिक सूचना विभागाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, 'माध्यमांनी या मुद्द्यावर काहीही दाखवले तरी विभागाची त्यात कोणतीही भूमिका नाही. तरीही या प्रकरणाची चौकशी करून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी विनंती आम्ही पोलिसांकडे केली आहे. 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या टीईटी परीक्षेत एकूण 3,32,913 जण बसले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


IND vs ENG, Live Streaming : फायनल गाठण्याआधी टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान; कधी, कुठं पाहणार सामना?


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI