Viral Post child Started Studying On Glass Of Car : देशाचे संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Amedkar) म्हणाले होते की, 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे, शिक्षणातून सर्व काही साध्य होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर (Social Media Photo Viral) एक फोटो व्हायरल होत आहे. या छायाचित्रात एक मुलगा चक्क गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
गाडीच्या काचेवर त्याने सुरू केला अभ्यास
लहान मुलाच्या घरात लाईट नसेल तर तो रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. नुकताच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुलगा भाजी विकताना अभ्यास करताना दिसत आहे. या छायाचित्रात मुलगा गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. अनेक मुलांकडे अभ्यासासाठी पैसे नसतात. अनेक मुलांकडे शिक्षणासाठी वह्या-पुस्तके घेण्याइतके पैसेही नसतात. काहींना वेळ आणि परिस्थितीमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता येत नाही. सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. हा फोटो पाहून काही लोक भावूक होत आहेत. या फोटोत पाहता येईल की, हा मुलगा गाडीच्या काचेवर इंग्रजी भाषेतील ABCD अक्षरे लिहित आहे. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सना आश्चर्यचकित करत आहे.
आयपीएस अधिकाऱ्याने केला फोटो शेअर
हे छायाचित्र सर्वप्रथम आयपीएस अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. हा फोटो शेअर करताना त्याने हृदयाला स्पर्श करणारी कॅप्शन लिहिली आहे. छायाचित्रासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे, ते ठिकाण आणि वेळ पाहत नाहीत.' सोशल मीडियावर हा फोटो समोर आल्यानंतर त्याला खूप पसंती दिली जात आहे. याला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही