Bike Stunt Viral Video : भारतासह परदेशात स्टंट करणाऱ्यांची काहीही कमी नाही. हजारोंच्या संख्येने लोक विविध ठिकाणी स्टंट (Stunt) करतात. कित्येकदा ते स्टंट पाहून आपल्याला डोळ्यांवर विश्वास देखील बसत नाही.कधी बाईकच्या हँडलवर बसून, कधी एका चाकावर बाईक उचलून तर कधी बाईक हवेत उडवून केलेले अनेक बाईक स्टंट तुम्ही पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका बाईक स्टंटचा व्हिडीओ जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसत आहे. जो व्हिडीओ पाहून तुम्ही बाकीचे सगळे स्टंट विसराल.अंगावर काटा आणणाऱ्या या स्टंट दरम्यान काही तरूण अगदी बिनधास्त बाईक आकाशाच्या दिशेने झेपावून स्टंट करताना दिसत आहेत. 


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण जमिनीवर बाईक चालवत असताना अचानक बाईक आकाशाच्या दिशेने उंचावतात, त्यांची बाईक चालवण्याची स्टाईल इतकी प्रभावी आहे की, जो कोणी पाहिलं तो बघतच राहिला. हे तरुण बाईक हवेच्या दिशेने उंचावत काही वेळ हँडलवरून हात काढतात. एवढेच नाही तर एकाने काही क्षण आपले शरीरही हवेत सोडून दिले. यानंतर बाईकच्या मागच्या भागाला पकडून त्याने पुन्हा बाईकचे हँडल हातात घेतले, असे दृश्य सहसा अंतराळात दिसते, कारण तिथे शून्य गुरुत्वाकर्षण असते. पण या तरुणांनी पृथ्वीवर असा पराक्रम केला आहे.


व्हिडीओमध्ये एक तरुण जमिनीवर बाईक चालवत असताना ती नंतर आकाशाच्या दिशेने नेतो. बाईक हवेच्या दिशेने वर गेल्यानंतर तो आपले शरीर बाईकपासून पूर्णपणे वेगळे नेतो आणि काही क्षण हवेत हात मोकळे सोडतो. यानंतर तो हळू हळू पुन्हा बाईकवर बसू लागतो आणि परत बाईक जमिनीवर आणतो. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीनेही आपल्या कामात कसलीही कसर सोडलेली नाही. तरुणांचे हे खतरनाक स्टंट त्याने प्रत्येक बाजूने आकर्षक पद्धतीने शूट करत दाखवले आहेत. यामुळे कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या बाईक रायडर्ससोबत कॅमेरामॅनचेही कौतुक केले आहे.हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


हा व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्याने शूट करण्यात आला आहे. अनेक युजर्स या स्टंटबाज तरुणांचे जोरदार कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले की, ‘मला आयुष्यात एकदा तरी याचा अनुभव घ्यायचा आहे.’ तर दुसऱ्या युजरने ‘कॅमेराने उत्तम काम केले आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्याने लिहिले आहे, 'कॅमेरामनचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. खूप खूप छान.'


 


इतर महत्वाच्या बातम्या


Burmese Python : अबब! सर्वात मोठं अजगराचं घरटं, 13 फूट लांब मादीची 111 अंडी; तुम्ही पाहिलं का?