US Burmese Python Eggs : अमेरिकेमध्ये (America) अजगराचं सर्वात मोठं घरटं सापडलं आहे. फ्लोरिडातील (Florida) कंर्जव्हेशन कम्युनिटीच्या पथकाला 13 फूट लांब मादी अजगराचं सर्वात मोठं घरटं सापडलं आहे. अजगराच्या या घरट्यामध्ये 100 हून अधिक अंडी सापडली आहे. फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाइफ कन्झर्वेशन कमिशन (Wildlife Conservation Commission) पथकाला 7 जुलै रोजी एक विशाल मादी अजगर आणि त्याचं घरटं सापडलं. या मादी अजगराची लांबी 13 फूट 9 इंच आहे. हा मादी अजगर बर्मी पायथन प्रजातीचा आहे. ही प्रजाती खूप घातक मानली जाते. या मादी अजगराच्या घरट्यामध्ये 111 अंडी सापडली आहेत.


सर्वात मोठं अजगराचं घरटं


फ्लोरिडाच्या एव्हरग्लेड्समध्ये अजगराची घरटी शोधणे हे तेथील जैवविविधता टिकवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. फ्लोरिडाच्या एव्हरग्लेड्समध्ये, स्थानिक वन्यजीवांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढत होती. यामुळे फ्लोरिडाच्या वन्यजीव संवर्धन पथकाकडून येथील जैवविविधता नष्ट करणाऱ्या प्राण्याचा शोध सुरु आहे. आता फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन कमिशनच्या पथकाने विशालकाय पायथन मादी आणि घरटं शोधलं आहे. पायथन अॅक्शन टीममधील अधिकारी फ्रान्सिस एस. टेलरने वन्यजीव व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश केलेल्या बर्मी पायथन (Burmese Python) ला शोधल्याची माहिती दिली आहे..


13 फूट लांब पायथन अजगराची 111 अंडी


फ्लोरिडा हे विविध प्रकारचे साप आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेसाठी (Reptiles) ओळखलं जातं. फ्लोरिडाच्या एव्हरग्लेड्समध्ये एका विशाल मादी बर्मी अजगराचे घरटे सापडलं आहे. या बर्मीज पायथन अजगराची लांबी 13 फूट 9 इंच होती. त्याच्या घरट्यात एकूण 111 अंडी सापडली. हे फ्लोरिडाच्या इतिहासात सापडलेलं सर्वात मोठं अजगराचं घरटं आहे. 






वन्यजीव क्षेत्रातून अजगराला हटवलं


फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाइफ कन्झर्वेशन कमिशन (Wildlife Conservation Commission) ने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला अजगर आणि त्याचं घरटं वन्यजीव क्षेत्रातून हटवण्यात आलं आहे. एव्हरग्लेड्स आणि फ्रान्सिस एस टेलर वन्यजीव व्यवस्थापन क्षेत्रातून 13 फूट आणि 9 इंच मादी बर्मी अजगर आणि 111 अंड्यांचे घरटे काढण्यात आलं. फ्लोरिडामध्ये बर्मीज अजगर ही अत्यंत आक्रमक प्रजाती मानली जाते.


अत्यंत आक्रमक प्रजातीचा विशालकाय अजगर


फ्लोरिडामध्ये बर्मी अजगर (Burmese Python) घुसखोर मानला जातो. कारण, बर्मी अजगर ही प्रजाती भारत, मलय द्वीपकल्प आणि काही वेस्ट इंडीज बेटांवर प्रामुख्याने आढळते. बर्मी पायथन अजगर फ्लोरिडाच्या एव्हरग्लेड्सच्या वन्यप्राणी परिसंस्थेसाठी धोका मानले जातात. हा अत्यंत आक्रमक शिकारी प्रवृत्तीचा अजगर आहे. फ्लोरिडातील बर्मी अजगरांना वन्यजीव नियमांनुसार संरक्षित मानलं जात नाही.