Buffalo Viral Video : आपल्याला आपल्या कर्माचं फळ मिळतं, असं म्हटलं जातं. चांगले कर्म केल्याने आपल्याला चांगलं फळ मिळतं, पण आपल्या वाईट कर्मांची फळही आपल्यालाच भोगावी लागतात. अनेकांना याचा प्रत्यय येतो. काहींना त्यांच्या कर्माची फळं उशिरा तर काहींना लवकर मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळं अवघ्या काही सेकंदात मिळालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ लगेचच मिळालं आहे. युजर्स या व्हिडीओवर कमेंट करत हे वाईट कर्माचं फळ असल्याचं सांगत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, दुचाकीस्वार रस्त्याने जाlत असताना शेजारील उभ्या असलेल्या म्हशीला लाथ मारतो, पण अवघ्या काही सेकंदात दुचाकीस्वार तोल जाऊन पडतात.


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका बाईकवरून दोन व्यक्ती रस्त्याने जात आहे. यावेळी रस्त्याच्या कडेला काही म्हशी उभ्या दिसत आहे. दुचाकीवरील मागचा व्यक्ती खोडसाळपणा करत रस्त्यावर शांत उभ्या असलेल्या म्हशीला लाथ मारतो. त्यानंतर पुढे जातो तेवढ्यातच म्हशीला लाथ मारल्यामुळे बाईकवरील दोघांचा तोल जातो आणि दोघे दुचाकीवरील व्यक्ती शेजारी असलेल्या झाडीमध्ये कोसळतात.






हा व्हिडीओ नरेंद्र सिंह या युजरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे की, 'कर्माचे फळ नक्कीच मिळतं. वाईट कृतीची शिक्षा लवकरच मिळते.' व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक युजर्स हा व्हिडीओ रिट्वीट आणि शेअर करत आहेत. काही नेटकऱ्यांनी भूतदया दाखवण्याचं आवाहन केलं आहे.


या व्हिडीओवरून तात्पर्य मिळते आहे की, आपल्या वाईट कर्माचं फळ नक्कीच मिळतं. त्यामुळे चांगले कर्म करत राहा. भूतदया दाखवा. प्राण्यांवर अन्याय करू नका, असंही काही युजर्स सांगत आहेत.


इतर बातम्या


Viral Video : 'थंडे-थंडे पाणी से...'; हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी वाजू नये म्हणून पठ्ठ्याची अनोखी शक्कल