Desi Jugaad For Bath in Winter : हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी एका पठ्ठ्यानं देशी जुगाड लावला आहे. थंडीमध्ये अंघोळ करणं म्हणजे जणू कसरत म्हणावं लागेल. उन्हाळ्यामध्ये गरमीने हैराण झालेले लोक दिवसातून तीन ते चार वेळा अंघोळ करतात, पण हिवाळ्यात अंघोळीचं नाव काढलं, तरी अनेकांना नकोस वाटतं. हिवाळ्यामध्ये पाण्यात अंघोळ करण म्हणजे जणूं थंडीला आमंत्रण असल्यासारखं वाटत. अंघोळीसाठी गरम पाणी घेतलं तरी, काही सेंकदात ते पाणी वाफ बनून उडून जात आणि पुन्हा थंडी वाजायला लागते. म्हणून अनेकांना थंडीत अंघोळ नकोशी वाटते. लहान मुलं तर अनेकदा सकाळी लवकर उठून शाळेत जाताना अंघोळ नको म्हणून रडतानाही तुम्ही पाहिलं असेल. 


आता एका व्यक्तीनं हिवाळ्यामध्ये अंघोळ करताना थंडी पाजू नये यासाठी अनोखी शक्कल लावली आहे. या देशी जुगाडामुळे त्याला अंघोळही करता येईल आणि थंडीही वाजणार नाही. व्हिडीओ पाहिल्यावर या व्यक्तीला चांगली युक्ती सुचली असं अनेक नेटकऱ्यांचं मत आहे. या व्यक्तीच्या देशी जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा देशी जुगाड अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.






या व्हायल व्हिडीओमध्ये पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की, एक व्यक्ती पाण्यामध्ये उतरून अंघोळ करत आहे. स्टाईल स्टार मिस्टर नावाच्या इंस्टाग्राम अकाऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तलावामध्ये उतरून अंघोळ करताना पाहायला मिळत आहे, पण पाण्यामध्ये थंडी लागू नये म्हणून या व्यक्तीने जे केलं आहे, ते पाहून सर्वच नेटकरी अवाक् झाले आहेत. हा व्यक्ती पाण्यामध्येच गवत जाळून आगीपासून शेकोटी घेत असल्याचं दिसत आहे.


तलावामध्ये पाण्यात अंघोळ करताना हा व्यक्ती आगीची शेकोटो घेताना दिसत आहे. या व्यक्तीचा देशी जुगाड नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. हजारो नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाही हा व्हिडीओ पाहून नक्कीच आश्चर्यचकित झाला असाल.