Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. कधी मनोरंजक तर कधी रोमांचक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. कधी कधी अंगावर शहारे आणणारे व्हिडीओही पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महाकाय अजगर (Python) भिंतीवरून घरात शिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पासून नेटकरीही चांगले थक्क झाले आहेत.


एका भारतीय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी (IFS: Indian Forest Services) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मोठा, लांबसडक अजगर दिसत आहे. हा अजगर घराबाहेर कठड्यावरून घरात घुसण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे.


या व्हायरल व्हिडीओमध्ये अजगर भिंत पार करुन घरात घुसण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. घराबाहेर एक दुचाकी आणि एक सायकलही उभी दिसत आहे. याशिवाय घराच्या दरवाजासमोर पाण्याचं भांड ठेवलेलं दिसत आहे.






 


व्हिडीओ खरा आहे की खोटा?
आईएफएस अधिकारी एस नंदा (IFS Officer Susanta Nanda) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओचं श्रेय 'एस्क्रिबानो' नावाच्या ट्विटर युजरला देत म्हटलं आहे की, मी याआधी अनेक फोटो शॉप केलेले व्हिडीओ पाहिले आहेत. पण असा शॉक देणारा व्हिडीओ पाहिला नव्हता.
 
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सुमारे 60 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेक जणांनी हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे. दरम्यान व्हिडीओमधील या अजगराचा आकार आणि व्हिडीओचं स्थान याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या व्हिडीओमधील अजगर खरा आहे की खोटा यावरून युजर्स तर्कवितर्क लावत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या