Bengaluru Cop Viral Video : आजच्या कलियुगात माणूस माणसाच्या मदतीला येत नाही, असं म्हणतात. तर मुक्या प्राणी आणि पक्षांना मदत करण्याचं तर दूरच राहिलं. पण एका चिमुकल्या मुक्या पक्ष्याचा जीव वाचवण्यासाठी एका वाहतूक पोलिसांने स्वत:च्या जीवाची बाजी लावली. पोलिसाने स्वत:चा जीव धोक्यात घालत कबुतराची (Pigeon) सुखरुप सुटका केली. बंगळुरूमध्ये एका वाहतूक पोलिसाने कबुतराचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावला आणि टॉवरवर चढून त्याची सुटका केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओतील पोलिसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. 


कबुतरासाठी जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत


एका वाहतूक पोलिसाने कबुतराचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला. बंगळुरूमधील राजाजीनगर परिसरात ही घटना समोर आली आहे. एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने हाय रेंज टॉवरवर एक कबुतर अडकल्याचे पाहिले. या कबुतराभोवती गुंडाळलेला धागा बाहेर काढण्यासाठी हा वातहूक पोलीस जीव धोक्यात घालून हाय रेंज लाइन टॉवरवर चढला आणि कबुतराची सुटका केली. या वाहतूक पोलिसाचे नाव सुरेश असे आहे. भूतदया दाखवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक सुरेश यांचे कौतुक करत आहेत.


पाहा व्हायरल व्हिडीओ






दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांनीही मंगळवारी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी लिहीले - 'आमचे पोलीस बचाव कार्यात गुंतले आहेत.' कर्नाटकच्या गृहमंत्रीत्यांनी त्या पोलिसाचे आभार मानले. मात्र, ही घटना कधी घडली याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.






टॉवरवर अडकले कबुतर 


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल, एक कबुतर टॉवरवर धाग्यामुळे अडकलेले आहे. त्याच्या पाय उडकल्यामुळे त्याला उडता येत नाही. बराच वेळ पक्षी उडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पक्ष्याचा अडचण पाहून वाहतूक पोलीस सुरेश कबुतराच्या मदतीला धावले. सुरेश कोणत्याही सुरक्षेशिवाय टॉवरवर चढले आणि कबुतराच्या पायाला बांधलेला धागा सोडवत पक्षाची सुटका केली. 


बंगळुरू वाहतूक पोलीस उपायुक्त कुलदीप कुमार जैन यांनी 30 डिसेंबर रोजी हा व्हिडीओ शेअर केला होता. उपायुक्तांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले - पोलीस कर्मचाऱ्याची लपलेली मायाळू प्रतिभा दिसून आली. सुरेशने यांचे कार्य कौतुकास्पद आहे.