Sardar Haji Jan Mohammad 60th Child : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतातील सरदार हाजी जान मोहम्मदच्या (Sardar Haji Jan Mohammad) 60 व्या मुलाचा जन्म झाला आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथील सरदार हाजी जान मोहम्मद या व्यक्तीने दावा केला आहे की, 1 जानेवारी (रविवारी) रोजी त्याच्या 60 व्या बाळाचा जन्म झाला आहे.


हाजी जान मोहम्मदने सांगितले की, त्यांच्या 60 मुलांपैकी 5 मुलांचा मृत्यू झाला आहे, आणि 55 मुले जिवंत असून स्वस्थ आणि निरोगी आहेत. क्वेट्टा येथील रहिवासी असलेला जान मोहम्मद व्यवसायाने डॉक्टर असून त्याच परिसरात त्यांचे क्लिनिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान मोहम्मदने 1999 मध्ये पहिले लग्न केले होते.


60 व्या मुलाचा जन्म


मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान मोहम्मदने प्रतिक्रिया देत सांगितले की, ही अल्लाहची दया आहे. आपल्या 60व्या मुलाच्या जन्मामुळे तो खूप आनंदी आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्या 60 व्या मुलाचे नाव हाजी खुशहाल खान ठेवले आहे. जान मुहम्मदने आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. 1999 मध्ये त्याने पहिले लग्न केले. पहिल्या पत्नीपासून जन्मलेल्या मुलीचे सध्याचे वय 22 वर्षे आहे. तिचे नाव सगुफ्ता नसरीन आहे.


चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा


सरदार हाजी जान मोहम्मदने चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लवकरच चौथ्यांदा लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी माझ्या सर्व मित्रांना माझ्या चौथ्या लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी सांगितलं आहे, असंही त्याने म्हटलं आहे. जान मुहम्मदने सांगितले की तो आणि त्याच्या सर्व पत्नी घरात मुलापेक्षा मुलींना प्राधान्य देतात.


जान मोहम्मदला आणखी मुले हवी आहेत


50 वर्षांच्या सरदार जान मोहम्मदला आणखी मुलं हवी आहेत. त्याने सांगितले की, 60 मुलांच्या जन्मानंतरही ते थांबणार नाहीत, जर अल्लाहची इच्छा असेल तर त्यांच्या घरात आणखी मुले जन्माला येतील. त्यांच्या पत्नींचीही तिच इच्छा आहे. सरदार जान मोहम्मद आणि त्याचे कुटुंब क्वेटा शहरातील ईस्टर्न बायपासजवळ राहतात. त्याचा कोणताही मोठा व्यवसाय नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा खर्च क्लिनिकमधील कमाईतून केला जातो. त्याने असेही सांगितले की त्यांच्या अनेक मुली लग्नाच्या वयाच्या योग्य झाल्या आहेत पण, तरीही मुलींना आणखी शिकवण्याची त्याची इच्छा आहे.


सरकारकडे मागितली बस


सरदार हाजी जान मोहम्मदला प्रवासाची आवड आहे. आपल्या मुलांनी पाकिस्तानच्या प्रत्येक भागाला भेट दिली पाहिजे असे त्याचे मत आहे. सर् मुलांना गाडीतून फिरायला नेणे शक्य नाही. त्यामुळे त्याने सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. जान मोहम्मदने पाकिस्तान सरकारकडे बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यामुळे तो आपल्या मुलांना फिरायला घेऊन जाऊ शकेल.