Anand Mahindra Monday Motivation Post : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा(Anand Mahindra) सोशल मीडीयाचे (Social Media) चाहते आहेत. ते त्यांच्या सोशल मीडीया फॉलोअर्ससाठी अनेक आकर्षक आणि प्रेरणादायी व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून ते स्व:तच भारावले आहेत. आणि कॅप्शनमध्ये ते म्हणाले की, हेच माझे Monday Motivation! काय आहे  व्हिडीओमध्ये?


गुरूंचा आदर, भारतीय परंपरा पाहून आनंद महिंद्रा भारावले!


 






"तेव्हा माझ्या अंगावर काटा आला" - आनंद महिंद्रा
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय ''सब मेजर स्वामी, राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल इन्स्ट्रक्टर यांचा 100 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला जात आहे. त्यांनी 7 भारतीय लष्करी सेनापतींना "सैन्य" तसेच आपल्या गुरूंचा आदर करण्याची भारतीय परंपरा सांगितली. जेव्हा त्यांनी सॅल्युट केला, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला"


नेटकरी झाले प्रभावित


आनंद महिंद्रा या व्हिडीओमुळे इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्या व्यक्तीच्या कल्पनेचे वर्णन मंडे मोटिव्हेशन (Monday Motivation) असे केले. युजर्सनी ही क्लिप पाहिल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. काही युझर्सनी या व्हिडीओवर कौतुक करत सलाम ठोकला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. जवळपास 2 मिनिटांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 40 हजार लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाइक केले आणि अनेकांनी रिट्विटही केले. कमेंट सेक्शनमध्येही लोक महिंद्राच्या या पोस्टबद्दल खूप प्रभावित होताना दिसले.


 


 


संबंधित बातम्या


Kerala : केरळच्या डॉक्टरांचं होतंय कौतुक! सुवाच्य अक्षरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल, रुग्णही स्पष्टपणे वाचू शकतील


Car Seat Belt: कारच्या मागच्या सीटवर बसतानाही सीटबेल्ट लावणार, आनंद महिंद्रा यांनी केला संकल्प