Anand Mahindra Tweet : प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा(Anand Mahindra) सोशल मीडीयाचे (Social Media) चाहते आहेत. ते त्यांच्या सोशल मीडीया फॉलोअर्ससाठी अनेक प्रेरणादायी व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी वडिल आणि मुलीच्या नात्यावर महत्वाची माहिती दिली आहे, 


वडिल आणि लेकींच्या सुंदर नात्यावर आनंद महिंद्रांची खास पोस्ट!


वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. ज्या मुलींचं आपल्या वडिलांसोबतच नातं सुंदर असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आठवणी सुंदर असतात. अशाच या गोड नात्यासाठी आनंद महिंद्रा यांनी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे, ज्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे, काय म्हटलंय त्यांनी पोस्टमध्ये? 
आनंद महिंद्रांनी पोस्टमध्ये म्हटलंय, "सर्व वडिलांना आणि मुलींना! प्रसिद्ध छायाचित्रकारांकडून तुमचे फोटो काढण्याची ही संधी गमावू नका. त्याच वेळी तुम्ही मुलीला शिक्षणाची भेटही द्याल
@NanhiKali, #ProudFathersForDaughter परत आलं आहे!"


 






शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींसाठी 'नन्ही कली कार्यक्रम'
आनंद महिंद्रा हे भारतीय उद्योगपती आहेत, ते भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या "महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड" या कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आनंद महिंद्रा यांचा 'महिंद्रा ग्रुप' ही भारतातील 10 मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आनंद महिंद्रा शिक्षणाला खूप महत्त्व देतात. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी, तसेच शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी 'नन्ही कली कार्यक्रम' सुरू केला. आनंद महिंद्रा यांचा सामाजिक कार्यात योगदान देण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये 'केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट' संचलित या उपक्रमाद्वारे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना शिक्षण दिले जाते. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत अनेक लहान मुलींना शिक्षण मिळाले आहे. याशिवाय या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. 


संबंधित बातम्या


Car Seat Belt: कारच्या मागच्या सीटवर बसतानाही सीटबेल्ट लावणार, आनंद महिंद्रा यांनी केला संकल्प