Viral Video : आपल्या देशात खवय्यांची कमी नाही. लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अगदी सगळेचजण स्ट्रीटफुडचा सर्रास आस्वाद घेताना दिसतात. स्वतःला फिटनेस फ्रिक म्हणवणारेही बऱ्याचदा चिट डेचा बहाणा करत सर्रास स्ट्रीट फुडवर ताव मारतात. स्ट्रीटफुडमध्ये समाविष्ठ होणारी आणि जवळपास सर्वच खवय्यांचा आवडता पदार्थ म्हणजे पाणीपुरी. 


मुंबईच नव्हे तर देशात कोणत्याही भागात गेलं तरी पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक दिसून येईल. लहान मुलांपासून ते मोठ-मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकजण पाणीपुरी खाण्याचा मोह टाळू शकत नाही. ही सगळी लोक आरोग्याची चिंता न करता पाणीपुरीवर (Panipuri) बिनधास्त ताव मारतात. पण आपल्याला ही पाणीपुरी चालत्या ट्रेनमध्ये मिळाली तर? होय! एका तरूणाने चक्क चालत्या ट्रेनमध्ये पाणीपुरीचं दुकानं थाटलं आणि खाण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. 


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण चक्क चालत्या ट्रेनमध्ये पाणीपुरी विकताना दिसून येत आहे. या तरूणाजवळ ते सर्व चटपटीत पदार्थ आहेत जे एखाद्या पाणीपुरीसोबत खाल्ली जातात. या पाणीपुरीवाल्याजवळ चटपटीत पाणी, गोड-तिखट चटणी, हरभरा आणि पापडीसुद्धा उपलब्ध आहे. या ट्रेनमधील बहुतांश प्रवासी पाणीपुरी खाताना दिसून येत आहेत. हा सर्व प्रसंग बघून ट्रेनमधील लोक आश्चर्यचकित झाली आणि बऱ्याच लोकांनी याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओत बरेच लोक पाणीपुरी खाण्यासाठी हातात कागदी द्रोण घेऊन उभं असल्याचं दिसून येत आहे. याचा सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 


चालत्या ट्रेनमध्ये लोकांनी घेतला पाणीपुरीचा आस्वाद 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन खूप वेगाने धावत आहे. परंतु, हा पाणीपुरीवाला तरूण बिनधास्तपणे पाणीपुरी विकताना दिसून येत आहे आणि प्रवासी आवडीने पाणीपुरी खाताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पाणीपुरीवाल्याच्या बिझनेस माईंडचं लोकांकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. याला एक नवीन्यपूर्ण उपक्रम म्हणून लोक प्रतिक्रीया देत आहेत. एक नेटकऱ्यानं म्हटलंय की, 'भारतीयांना कुणीही हरवू शकत नाही.' तर एका नेटकऱ्यांनं म्हटलंय की, 'मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये असं होऊ शकत नाहीत.' या व्हिडीओवर दुसऱ्या एका ट्विटर युजरनं पाणीपुरी विकणाऱ्या तरूणांचं प्रचंड कौतुक केलं, तर काही लोकांनी हे चुकीचं असल्याचं सांगितलं आहे.






पाणीपुरीचा महाभारताशी आहे संबंध


पाणीपुरीला महाभारकाळात जलपुत्र या नावाने आळखलं जात होतं. या स्ट्रीट फूडचा महाभारत काळाशी संबंध असल्याचंही मानलं जातं. पाणीपुरीचे भारतात प्रदेशानुसार नाव बदलल्यांचं दिसून येतं. जसे की, महाराष्ट्रात पाणीपुरी, हरियणात पाणी पतशी, मध्य प्रदेशात फुलकी, उत्तर प्रदेशात पाणी के बताशे किंवा पाणी के पडके, आसाम राज्यात फुस्का किंवा पुस्का, ओडिशात गुप-चुप, गुजरातच्या काही भागांत पकोडी, दक्षिण झारखंड, छत्तीसगड, बंगाल, बिहार, नेपाळ आणि आंध्र प्रदेशात फुचका म्हणून ओळखलं जातं. उत्तर भारतातील काही भागांत पाणीपुरीला गोलगप्पा या नावाने  ओळखलं  जातं. मात्र, मार्च 2005 रोजी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये 'पाणीपुरी' या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पाणीपुरीचा उगम नेमका कसा झाला? याबद्दल निश्चित अशी माहिती मिळत नाही.


पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ, रवा आणि मैदा वापरला जातो. याची चव वाढवण्यासाठी पुदिना, चिंच आणि कोथिंबीर यांपासून पाणी तयार केलं जातं. तसेच पुरीत सारण म्हणून भरण्यासाठी बटाटा, चणे आणि वाटाण्याच्या मिश्रणाचा वापर केला जातो. 


इतर महत्वाच्या बातम्या वाचा :


कोरोनात पाणीपुरी खायला घाबरू नका! औरंगाबादच्या दोन तरुणांनी बनवलं पाणीपुरीचं मशीन